Marathi News> भारत
Advertisement

रहस्यमयी खाण! आजूबाजूने जाणाऱ्यांना येतो भीतीदायक आवाज, काय आहे गूढ?

जर तुम्हाला या ठिकाणाविषयी माहिती असेल तर तुम्हाला भीती वाटेल

रहस्यमयी खाण! आजूबाजूने जाणाऱ्यांना येतो भीतीदायक आवाज, काय आहे गूढ?

उत्तराखंड : उत्तराखंड आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. दैनंदिन जीवनाला कंटाळून शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी पर्यटक उत्तराखंडमध्ये येतात, त्याचप्रमाणे साहसप्रेमी देखील याठिकाणी ट्रेकिंग, हायकिंग, वॉटर राफ्टिंग यांसारखे अनेक मजेदार उपक्रम करतात. पण पर्वतांच्या या सौंदर्याच्या मधोमध एक अशी जागा आहे, जिथे गेलं तरी त्याबद्दल लोकांना बोलावंसं वाटत नाही. 

जर तुम्हाला या ठिकाणाविषयी माहिती असेल तर तुम्हाला भीती वाटेल, कारण हे उत्तराखंडमधील सर्वात भीतीदायक ठिकाण मानलं जातं.

उत्तराखंडमधील मसुरीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या Lambi Dehar Minesबद्दल आपण बोलत आहोत. या ठिकाणच्या काही किलोमीटरपर्यंत लोकांमध्ये भीतीचे वातावरण असतं. या खाणीशी अनेक भयकथा चर्चेत आहेत, ज्यामुळे लोकांना त्या दिशेने जायलाही भीती वाटते. 

आजूबाजूचे लोक नवीन पर्यटकांना या ठिकाणी न जाण्याची चेतावणी देतात. इतकंच नव्हे तर इथल्या कथाही त्यांना सांगतात. या ठिकाणी अनेक हॉरर चित्रपट आणि मालिका शूट झाल्या आहेत. जर तुम्ही तिथल्या कोणत्याही व्यक्तीला Lambi Dehar Mines विचारला तर ते घाबरतील आणि तुम्हाला तिथे जाण्यास नकार देतील.

या खाणीची कहाणी

ही गोष्ट 1990 सालची आहे. त्यावेळी येथे खाणकाम सुरू होतं आणि हजारो मजूर खाणीच्या आत काम करत असल्याचं सांगण्यात येतं. परंतु खाणीच्या चुकीच्या कामामुळे सुमारे 50 हजार मजूर खाणीत गाडले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी या खाणीजवळ काम करणाऱ्या कामगारांना फुफ्फुसाचा आजार झाला आणि खोकल्याने त्यांचा मृत्यू झाला. सर्व मजुरांना रक्ताच्या उलट्या झाल्या असल्याचंही सांगण्यात येतं. 

यानंतर ही खाण मसुरीतील सर्वात धोकादायक ठिकाण बनलं. आजही तिथे जाणाऱ्यांना तो भीषण अपघात जाणवतो. तिथलं वातावरण इतकं नकारात्मक असल्याचं अनेकांनी सांगितलं.

या खाणींजवळून जाणार्‍या लोकांना अनेकदा किंचाळण्याचे किंवा रडण्याचे आवाज ऐकू येत असल्याचं समोर आलंय. पण आजूबाजूला कोणी दिसत नाही. दरम्यान दरवर्षी अपघातांची संख्या वाढू लागलीये, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळेच खाणी बंद पडल्या.

या ठिकाणी फार मोजके लोकं राहत असून त्यांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी आत्म्याचं वास्तव्य आहे, म्हणून ते ओरडत असतात. लोकांनी सांगितलं की, या खाणीसमोरून जाणारा माणूस एकतर मृत्यूला कवटाळतो किंवा त्याचा भीषण अपघात होतो.

Read More