Marathi News> भारत
Advertisement

'तिने' आपल्या पिलांना वाचविण्यासाठी कोब्राशी दिला लढा

आईचा आपल्या मुलांवर जीव असतो. आपल्या लेकरांसाठी ती काहीही करु शकते. 

'तिने' आपल्या पिलांना वाचविण्यासाठी कोब्राशी दिला लढा

ओडिशा : आईचा आपल्या मुलांवर जीव असतो. आपल्या लेकरांसाठी ती काहीही करु शकते. मुलांवर संकट येत असेल तर ती काहीही करण्यासाठी तयार असते. मग ते मानव असो किंवा प्राणी. (हा थरारक व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

अशीच काहीशी घटना ओडिशातील भद्रक गावात घडलीय. एका विषारी कोब्राने कुत्रीच्या पिल्लावर हल्ला केला. काही दिवसांपूर्वीच या कुत्रीनं पिल्लांना जन्म दिला होता. मात्र शांतपणे बसलेल्या या कुत्रीच्या पिल्लांवर कोब्राने अचानक हल्ला केला. हे पाहताच त्या कुत्रीने कोब्राचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

पिल्लांना वाचवण्यासाठी कोब्राशी ती झुंज देऊ लागली. मात्र तिचे हे प्रयत्न अपयशी ठरले. चारपैकी केवळ एका पिल्लाला वाचवण्यात या कुत्रीला यश आलं. ही घटना पाहताच वनाधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. वनाधिकारी तिथे पोहचले आणि त्यांनी या कोब्राला ताब्यात घेतले.

पाहा हा व्हिडिओ

Read More