Marathi News> भारत
Advertisement

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी विकत घेण्यापूर्वी 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

ही ज्वेलरी अगदी वेस्टनपासून ते ट्रेडिशनल सगळ्याच कपड्यांवर जाते आणि एक चांगल प्रिमीयम लूक देते.

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी विकत घेण्यापूर्वी 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

मुंबई : सध्या ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा ट्रेंड सुरू आहे. ही ज्वेलरी अगदी वेस्टनपासून ते ट्रेडिशनल सगळ्याच कपड्यांवर जाते आणि एक चांगल प्रिमीयम लूक देते. यामुळे बाजारात ऑक्सिडीज्ड दागिन्यांची मागणी खूप वाढली आहे. सामान्य मुलींपासून ते सेलेब्सपर्यंत, ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचा वापर आता सगळेच लोकं करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची खूप काळजी देखील घ्यावी लागते. अन्यथा ती लगेच काळी पडू लागते.

ऑक्सिडाइज्ड दागिन्यांमध्ये सिल्व्हर सल्फाइडच्या अस्तित्वामुळे त्यात काळेपणा येतो. पण जास्त काळा किंवा बेज ज्वेलरी वाईट दिसते. त्यामुळे ऑक्सिडाइज्ड दागिने खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

खराब गुणवत्तेमुळे एलर्जी होऊ शकते

इतर दागिन्यांप्रमाणे, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासा. दागिने बनवण्यासाठी वापरलेल्या धातूकडे लक्ष द्या. जर दागिन्यांची गुणवत्ता खराब असेल, तर त्यामुळे त्वचेची अॅलर्जी होऊ शकते. म्हणून, दागिने खरेदी करताना, धातूची उपलब्धता लक्षात ठेवा.

वजनात फरक

खरं तर, स्वस्त ऑक्सिडीज्ड दागिन्यांचे वजन जास्त असते. दुसरीकडे, जर तुम्ही ते एका चांगल्या दुकानातून विकत घेतले, तर ते दिसायला जड दिसते पण त्यांचे वजन हलके असते. म्हणून, तुम्ही स्वस्तच्या जाळ्यात अडकू नका आणि दागिने खरेदी करताना चांगल्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या. ज्यामुळे तुम्हाला ते जड वाटणार नाही आणि तुम्ही त्याला आरामात कॅरी करु शकता.

विश्वसनीय दुकानातून खरेदी करा

ऑक्सिडीज्ड दागिने खरेदी करताना, ब्रँड लक्षात ठेवा. तथापि, आपण कोणतेही दागिने ऑनलाइन खरेदी करत असल्यास, त्यावस्तूची माहिती पूर्णपणे वाचा. या व्यतिरिक्त, ते खरेदी करताना, इतर वेबसाइट्स देखील तपासा जेणेकरून आपण आपल्या बजेटनुसार योग्य दागिने निवडू शकाल.

पावसाळ्यात विशेष काळजी घ्या

पावसाळ्यात ऑक्सिडाइज्ड दागिने खूप लवकर खराब होतात. म्हणून, ते खराब होऊ नये म्हणून, एका बॉक्समध्ये कापूस ठेवा जेणेकरून तुमची दागिने लवकर खराब होणार नाही.

Read More