Marathi News> भारत
Advertisement

रक्षणकर्त्यांचा क्रूर चेहरा; महिलेला अर्ध्या रात्री पोलिसांकडून पट्ट्यानं मारहाण

महिला आयोगाच्या सदस्या रेनू भाटिया यांनी पोलीस आयुक्तांकडे आणि पोलीस महानिरीक्षकांकडे दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली

रक्षणकर्त्यांचा क्रूर चेहरा; महिलेला अर्ध्या रात्री पोलिसांकडून पट्ट्यानं मारहाण

फरिदाबाद : हरियाणाच्या फरिदाबादमध्ये पोलिसांचा एक क्रूर चेहरा समोर आलाय. कर्तव्यालाच नाही तर मानवतेलाही काळिमा फासणारा पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशनच्या आवारात एका महिलेला अर्ध्या रात्री क्रूरतेनं बेल्टनं मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हडिओ वल्लभगडच्या आदर्शनगर स्टेशनमधील असल्याचं समजतंय. एका महिलेला तेही रात्री उशिरा अशा पद्धतीनं ताब्यात घेणं आणि मारहाण करणं बेकायदेशीर असल्याचं सांगत महिला आयोगाच्या सदस्या रेनू भाटिया यांनी पोलीस आयुक्तांकडे आणि पोलीस महानिरीक्षकांकडे दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. 

fallbacks
सौ. सोशल मीडिया


व्हायरल झालेल्या व्हिडिओत काही पोलिसांच्या समोर एक महिला उभी असलेली दिसते. पोलीस महिलेची चौकशी करत आहेत... सोबतच तिला पट्ट्यानंदेखील मारहाण केली जात आहे. धक्कादायक म्हणजे, हा व्हिडिओ तिथंच उपस्थित असलेल्या एका पोलिसानं बनवलेला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असला तरी ही घटना घटून काही महिने उलटलेत. ही घटना ऑक्टोबर २०१८ मध्ये घडली होती.  

fallbacks
सौ. सोशल मीडिया


या प्रकरणी कारवाई करत असलेल्या वल्लभगडचे पोलीस सहाय्यक आयुक्त जयवीर राठी यांच्या म्हणण्यानुसार, दोषी पोलिसांची ओळख पटवण्यात आलीय. मात्र, ही पीडित महिला कोण आहे? याची माहिती अजून मिळालेली नाही. 

या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी दोषी आरोपींवर कारवाई करत पोलीस कॉन्स्टेबल बलदेव आणि रोहित यांना निलंबित केलंय. सोबतच तीन एसपीओ कृष्ण, हरपाल आणि दिनेश यांना घरचा रस्ता दाखवण्यात आलाय. 

Read More