Marathi News> भारत
Advertisement

'विकासदाराची घसरण ही धोक्याची घंटा; देशातील नोकरशाहीला भीती वाटली पाहिजे'

दुर्दैवाने विकासदराचे आकडे जाहीर झाल्यानंतर केवळ सुरुवातीलाच जलद हालचाली झाल्या. 

'विकासदाराची घसरण ही धोक्याची घंटा; देशातील नोकरशाहीला भीती वाटली पाहिजे'

नवी दिल्ली: एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवसेथेचा विकासदर उणे २३.९ टक्क्यांपर्यंत घसरणे ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आता नोकरशहांनी आत्मसंतुष्टता सोडून अर्थपूर्ण निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. रघुराम राजन यांनी आपल्या LinkedIn पेजवर यासंदर्भात सविस्तर भाष्य केले आहे. 

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती पाहता अर्थपूर्ण आणि कार्यतत्पर सरकारची गरज आहे. परंतु, दुर्दैवाने विकासदराचे आकडे जाहीर झाल्यानंतर केवळ सुरुवातीलाच जलद हालचाली झाल्या. यानंतर सरकार पुन्हा आपल्या कोषात गेले, अशी टिप्पणी राजन यांनी केली.

'तरुणांना नोकरी पाहिजे, पण मोदी सरकार...' राहुल गांधींचा निशाणा

विकासदरातील २३.९ टक्क्यांची घट ही धोक्याची घंटा आहे. असंघटित क्षेत्रातील नुकसानीची आकडेवारी हाती आल्यानंतर ही आकेडवारी आणखी नकारात्मक असेल. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटली आणि अमेरिकेत विकासदर अनुक्रमे १२.४ आणि ९.५ टक्क्यांनी  घसरला. या सगळ्याची तुलना करायची झाल्यास विकासदरातील ही घसरण आपल्यासाठी धोक्याचा इशारा आहे. देशातील नोकरशाहीला याची भीती वाटली पाहिजे, असे राजन यांनी सांगितले. 

राहुल गांधींचा 'तो' इशारा खरा ठरला; जीडीपीची ऐतिहासिक घसरण

भविष्याचा विचार करून सध्या हात आखडता घेण्याची केंद्र सरकारची रणनीती आत्मघाती ठरली आहे. सरकारने दिलासा देणाऱ्या उपाययोजना केल्याशिवाव विकासदराच्या वृद्धीक्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आता सरकारला अधिक हुशारीने आणि जास्तीत जास्त पैसा खर्च करण्याची गरज असल्याचे मत रघुराम राजन यांनी व्यक्त केले.  

Read More