Marathi News> भारत
Advertisement

विमान उंचीवर पोहोचताच झोपतात पायलट, जाणून घ्या विमानाशी संबंधित अनोखे फॅक्ट्स

जाणून घ्या, हवाई प्रवास आणि विमान कंपनीशी संबंधित काही रोमांचक तथ्ये...

विमान उंचीवर पोहोचताच झोपतात पायलट, जाणून घ्या विमानाशी संबंधित अनोखे फॅक्ट्स

मुंबई : प्रवास करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही देखील वेगवेगळ्या वाहानाने किंवा मार्गाने प्रवास केला असणार, जसे की रेल्वे, बस, विमान, टॅक्सी, बोट इत्यादी. पण तरीही, विमानाने प्रवास करण्याचा आनंद हा काही वेगळाच होतो. शिवाय विमान प्रवासामुळे प्रवासाचा वेळ देखील वाचला आहे. परंतु असे असले तरी, विमानाबाबत काही असं गुपित समोर आलं आहे, जे एअरलाइन्स कंपन्या आपल्यापासून लपवून ठेवतात. अशा परिस्थितीत जाणून घेऊया, हवाई प्रवास आणि विमान कंपनीशी संबंधित काही रोमांचक तथ्ये...

याकारणामुळे विमानात लावले जातात डिम लाईट

बर्‍याच लोकांना वाटते की फ्लाइटमध्ये डिम लाईट लावली जातात जेणेकरून प्रवाशांच्या डोळ्यांना आराम मिळेल आणि ते झोपेत असताना त्यांना त्रास होऊ नये. शकतात. मात्र या सर्वांमागे कारण वीजपुरवठा हे कारण आहे. वास्तविक, धावपट्टीवर लँडिंग किंवा टेक-ऑफ दरम्यान, विमानाला अतिरिक्त उर्जेची आवश्यकता असते, ज्यामुळे फ्लाइटमध्ये जळणारे सर्व दिवे पूर्णपणे बंद केले जातात आणि त्यांच्या जागा हे डिम लाईट घेतात.

पायलट्सना मिळत नाही प्रवाशांचं जेवण

विमानात तुम्हाला मिळणारे अन्न हे पायलट्सला मिळणाऱ्या अन्नापेक्षा वेगळे असते? विमान कंपन्या प्रवाशांच्या वैमानिकांना स्वतंत्र जेवण देतात. वास्तविक, उड्डाण दरम्यान, पायलटला हलके अन्न दिले जाते, जे सहज पचते. कारण जर पायलटला प्रवाशांप्रमाने तळलेले, भाजलेले किंवा जास्त मसालेदार अन्न खायला दिले, तर त्याचे पोट खराब होऊ शकते, ज्यामुळे तो टॉयलेटमध्ये अडकू शकतो.

पायलट उंचावर झोपतात

तुम्ही विमानात बसलात आणि तुम्हाला कळलं की तुमचा पायलट झोपला आहे तर? ही बातमी ऐकून नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हे ऐकायला थोडं भीतीदायक वाटतं असलं तरी ते खरं आहे. वास्तविक, उंचावर गेल्यावर विमानाच्या आत हवेचे खिसे तयार होऊ लागतात, त्यामुळे पायलटला झोप येते. अशा परिस्थितीत पायलट झोपण्यापूर्वी विमानाचा ऑटो पायलट मोड चालू करतो. परंतु तुम्ही घाबरू नका, एक पायलट झोपल्यानंतर दुसरा पायलट जागे असतो. ज्यामुळे तुमच्या विमानाचा पायलट झोपला असला तरी, कोणत्याही प्रॉबलम शिवाय विमान हवेत उडत राहातं.

Read More