Marathi News> भारत
Advertisement

Fack Check : Lionel Messi चं भाजप कनेक्शन? 'त्या' Tattoo मुळे रंगली चर्चा

lotus tattoo : फिफा फायनलमध्ये (FIFA World Cup) 35 वर्षीय लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला आणि त्यांनी इतिहास रचला. लिओनेल मेस्सीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि भाजपचं (BJP)खास कनेक्शन आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

Fack Check : Lionel Messi चं भाजप कनेक्शन? 'त्या' Tattoo मुळे रंगली चर्चा

Lionel Messi Tattoo : ट्रॉफीला किस (Kiss the trophy), स्टेजवर डान्स...अखरे फुलबॉलचा सम्राट लिओनेअ मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न पूर्ण झालं. कतारच्या स्टेडियमवर एक रोमहर्षक विजयानंतर अर्जेंटिनामध्ये जल्लोषासाठी बाहेर पडलेल्या लोकांचा जणू काही अथांग असा सागर दिसतं होता. अख्ख जग डोळे दिपवून टाकणारं हे सेलिब्रेशन पाहून थक्क झाला. मग काय लिओनेअ मेस्सीचे अनेक व्हिडिओ (Leone Messi Video), जुने फोटो असो किंवा मुलाखती सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) झाल्यात. अशातच लिओनेअ मेस्सी आणि भाजपचं कनेक्शन सांगणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 


मेस्सी आणि भाजप कनेक्शन?

मेस्सी आणि भाजपचं (bjp) कसं कनेक्शन आहे याबद्दल चर्चा होण्यामागे एक टॅटू कारणीभूत ठरला आहे. मेस्सीच्या शरीरावर अनेक टॅटू आहेत. पण त्याचा हातावरील कमळाचा टॅटू (lotus tattoo) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. बस्स मग काय मेस्सीचं भाजपशी खास नातं आहे अशी चर्चा रंगली. Fack Check मध्ये हा सगळ्या घोळ एका टॅटूवरुन झाला आहे. 


भाजप या पक्षाचं चिन्ह हे कमळ असल्याने मेस्सी आणि भाजपचं नातं जोडल्या गेलं आहे. याच टॅटूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बस्स मग नेटकऱ्यांना विषय मिळाला आणि त्यांनी वेगवेगळे फोटो व्हायरल करायला सुरुवात केली. टॅटूप्रेमींना जाणून आनंद होईल की मेस्सीच्या शरीरावर जवळपास 12 टॅटू आहेत. 


मेस्सी निवृत्त नाही होणार 

दरम्यान दुसरीकडे आपण एवढ्यात निवृत्त होणार नसल्याचं त्यानं जाहीर केल्यानं चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. मेस्सी नावाचा हा सम्राट पुन्हा एकदा जग जिंकायला सज्ज झालाय. त्यामुळे आता मेस्सी 2026 चा देखील वर्ल्डकप खेळणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटीनाचा विजय

सर्वात रोमहर्षक आणि अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या फायनलमध्ये अर्जेंटीनाने थरारक विजय मिळवलाय. फिफाच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली आणि 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला. अर्जेंटिनासाठी मेस्सी (Lionel Messi) आणि डी मारियाने पहिल्या हाफमध्ये दोन गोल करत विजयी आघाडी घेतली. तर अखेरीस अर्जेंटिनाने 4-2 (Argentina vs France) असा विजय साकारत तिस-यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.

Read More