Marathi News> भारत
Advertisement

Chanda Kochhar Arrested : सीबीआयची मोठी कारवाई! ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांना अटक

ICICI Bank Fraud Case : चंदा कोचर ज्यावेळी आयसीआयसीआयच्या सीईओ आणि एमडी होत्या, त्यावेळी आयसीआयसीआय बँकेने (Videocon Fraud) व्हिडीओकॉन ग्रुपला 3 हजार 250 कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे.

Chanda Kochhar Arrested : सीबीआयची मोठी कारवाई! ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांना अटक

CBI arrests Chanda Kochar: आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर (Chanda Kochar) आणि चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochhar) यांना सीबीआयने (CBI) अटक केली आहे. कथित कर्ज फसवणूक प्रकरणात (ICICI  bank - Videocon loan fraud case) सीबीआयने ही कारवाई केली आहे. दोन वर्षापूर्वी ईडीने चंदा कोचर यांची 78 कोटींची मालमत्ता ईडीने (ED) जप्त केली होती. त्यानंतर आता सीबीआयने कोचर दाम्पत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Ex ICICI Bank CEO Chanda Kochhar Husband Deepak Kochhar Arrested In Loan Fraud Case)

चंदा कोचर (ICICI Bank Fraud Case) ज्यावेळी आयसीआयसीआयच्या सीईओ आणि एमडी होत्या, त्यावेळी आयसीआयसीआय बँकेने (Videocon Fraud) व्हिडीओकॉन ग्रुपला 3 हजार 250 कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे. ईडीने या प्रकरणात 2019 साली कारवाई केली होती. त्यावेळी खटला देखील दाखल केला होता.

चंदा कोचर पदावर असताना त्यांनी व्हिडीओकॉन समूहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत (Venugopal Dhoot) यांना कर्ज दिलं होतं. त्यावेळी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आणि नियम डावलून काम केल्याचा आरोप करण्यात आला होता.

आणखी वाचा - 81 कोटी लोकांना वर्षभर मोफत धान्य; 2023 साठी मोदी सरकारची छप्परफाड योजना

दरम्यान, व्हिडीओकॉन समूहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत (Venugopal Dhoot) यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochhar) यांच्या व्यवसायात 64 कोटी रुपयांचे भांडवल गुंतवल्याचा आरोप आहे. 3250 कोटींपैकी 2810 कोटी रुपये बुडीत कर्ज (Bad debt) म्हणून जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे ईडी (ED) आणि सीबीआयचा (CBI) संशय बळावला गेला आणि सीबीआयने आता कारवाई केली आहे.

Read More