Marathi News> भारत
Advertisement

लग्नात नवरदेवाची पाठ फिरली आणि नवरीच्या Ex-Boyfriendने जे केलं त्याला तुम्ही काय म्हणाला?

लग्नात Ex-Boyfriend ची एन्ट्री, नवरदेवाची पाठ फिरताच....

लग्नात नवरदेवाची पाठ फिरली आणि नवरीच्या Ex-Boyfriendने जे केलं त्याला तुम्ही काय म्हणाला?

मुंबई : आपल्या Ex च्या लग्नाला जाणं याहून मोठी शिक्षा काहीच नसेल. मनातल्या जोडीदारासोबत वेगवेगळ्या कारणांमुळे लग्न होत नाही. कधी आपलं प्रेम दुरावतं तर कधी जबाबदाऱ्या आड येतात. पण आपल्या एक्सच्या लग्नाला जायला हिंम्मतच हवी. अशीच हिम्मत एका तरूणाने केलीय. हा पठ्ठा आपल्या काळजावर दगड ठेवत गर्लफ्रेंडच्या लग्नाला हजर राहिला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हा तरूण आपल्या गर्लफ्रेंडच्या लग्नाला गेला. एवढंच नव्हे तर नवरदेवाची जाऊन त्याने गळाभेट घेतली. त्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र नवरदेवाची पाठ फिरताच आपल्या गर्लफ्रेंडकडे बघत मान हलवतो. 

गर्लफ्रेंडने आपल्याला फसवल्याच्या वेदना त्याच्या डोळ्यात दिसून येतात. त्याचे डोळे पाण्याने भरलेले दिसतात. एक्स-बॉयफ्रेंडची ती नजर पाहून नवरीसुद्धा आपली नजर झुकवते. त्यानंतर एक्स-बॉयफ्रेंड चेहऱ्यावर पुन्हा खोटं हसू दाखवत, स्टेजवरून खाली जातो.

जारा क्वीन इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा एक इन्स्टाग्राम व्हिडीओ असला तरी किती तरी जणांसोबत हे प्रत्यक्षात घडलं आहे. त्यामुळे असे लोक हा व्हिडीओ पाहून इमोशनल होत आहेत. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Read More