Marathi News> भारत
Advertisement

पेट्रोल-डिझेल जीएसटीत आणण्यावरुन भाजपच्या दोन मंत्र्यांमध्येच वाद

पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असताना आणि इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी वाढत असताना या निर्णयाशी संबंधित दोन मंत्र्यांमध्येच वाद असल्याचं पुन्हा समोर आले आहे.

पेट्रोल-डिझेल जीएसटीत आणण्यावरुन भाजपच्या दोन मंत्र्यांमध्येच वाद

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असताना आणि इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी वाढत असताना या निर्णयाशी संबंधित दोन मंत्र्यांमध्येच वाद असल्याचं पुन्हा समोर आले आहे.

पेट्रोल- डिझेल दराचा नवा उच्चांक

पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन जीएसटीच्या कक्षेत आणावं, असं मत व्यक्त केलंय. त्याच वेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र याला विरोध दर्शवलाय. इंधन दरवाढीमुळे लोकांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत असल्यामुळे आता पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणायला पाहिजे, असं प्रधान म्हणाले. टर्की, इराण, व्हेनेझुएला या देशांनी उत्पादन वाढवण्याचं आश्वासन पाळलं नसल्याचं प्रधान यांनीही अधोरेखित केलं. 

केंद्रीय पेट्रोलिअम मंत्र्यांचा भाजपाला घरचा आहेर

दरम्यान, पेट्रोल दरवाढ विरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेनं अनोखं आंदोलन केलं. पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावले आहेत त्याच्याच बाजूला, शिवसेनेनं पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीचे बॅनर लावून  हेच का अच्छे दिन? असा सवाल सरकारला केला. 

Read More