Marathi News> भारत
Advertisement

Pfo Intrest Rate : पीएफ व्याजदराबाबात सर्वात मोठी बातमी

भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (Epfo) आर्थिक वर्ष 2022 मधील मोठा निर्णय घेतला आहे.

Pfo Intrest Rate : पीएफ व्याजदराबाबात सर्वात मोठी बातमी

मुंबई :  भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आर्थिक वर्ष 2022 मधील मोठा निर्णय घेतला आहे. पीएफ वरील व्याजदर आणखी कमी होऊ नये यासाठी ईपीएफओ इक्विटी गुंतवणूकीची मर्यादा 15 टक्क्यावरुन 25 टक्के करणार आहे. ईपीएफओच्या वित्त गुंतवणूक समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळाची महिन्याच्या अखेरीस बैठक होणार आहे. या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. (epfo to increase equity investment limit know details about intrest rate and all)

40 वर्षात सर्वात कमी व्याजदर

सध्या सर्व गुंतवणुकीवर केवळ 7 ते 8% व्याज दिला जात आहे.  त्यामुळे आर्थिक वर्ष 2022 साठी पीएफवरील व्याज दर 40 वर्षांतील सर्वात कमी म्हणजे 8.1 टक्के आहे. पण इक्विटी गुंतवणुकीतील परतावा 14% पर्यंत आहे. त्यामुळे इक्विटीमधील हिस्सा वाढवून कोटी पीएफधारकांना देखील चांगलं व्याज मिळेल.

Read More