Marathi News> भारत
Advertisement

79 व्या वर्षी उद्योगपती देणार स्टार्टअपला बळ, शेअर मार्केटमध्ये येणार तिसरा IPO

Happiest Health चा नवा IPO ते आता लवकरच शेअर मार्केट मध्ये आणणार आहेत. 

79 व्या वर्षी उद्योगपती देणार स्टार्टअपला बळ, शेअर मार्केटमध्ये येणार तिसरा IPO

Happiest Minds Cofounder Ashok Soota: देशाचे नामवंत उद्योगपती लवकरच आपल्या नव्या स्टार्टअपचा IPO शेअर बाजारात आणणार आहेत. Mindtree आणि Happiest Minds या दोन कंपन्यांनंतर अशोक सुटा यांनी Happiest Health या नव्या स्टार्टअपची स्थापना केली आहे. Happiest Health चा नवा IPO ते आता लवकरच शेअर मार्केट मध्ये आणणार आहेत. 

अशोक सुटा यांनी वयाच्या 79 वर्षीही आपल्या कामाची जिद्द सोडली नसून हा IPO ते पुढील पाच वर्षांत लॉन्च करणार आहेत. त्यांचा Happiest Minds हा स्टार्टअप health आणि wellness वर आधारित आहे. नुकत्याच एका मोठ्या वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीनूसार या नव्या स्टार्टअपबद्दल बोलताना सांगितले की, काम हाच माझ्या मेंदूसाठी एक व्यायाम आहे. अशोक सूटा हे बंगलोर येथे राहतात. त्यांचे घरही विप्रो कंपनीच्या अगदीच जवळ आहे. 

1984 साली ते विप्रो या कंपनीत काम करत होते. विप्रोचे फाऊंडर अझीमजी प्रेमजी यांच्या हाताखाली त्यांनी काम केले. त्यानंतर 15 वर्षे विप्रोमध्ये काम केल्यानंतर त्यांनी 1999 साली त्यांनी विप्रोतून राजीनामा दिला आणि त्यावेळी त्यांनी Mindtree या आपल्या नव्या कंपनीची सुरूवात केली आणि 2007 साली त्यांना आपला पाहिला  IPO घेतला होता. 

त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकीर्द एक महत्त्वाचे पाऊल उचलले. 2011 साली त्यांनी Happiest Minds या कंपनीची स्थापना केली होती आणि त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात त्यांनी त्यांचा दुसरा IPO लॉन्च केला होता. याच एका कंपनीची market value साधारणतः 2.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचली होती तेव्हा अशोक सुटा हे जगातल्या बिलियनिअर क्लबमध्ये आले होते. 

Read More