Marathi News> भारत
Advertisement

Trending Video: गायीनंतर आता हत्तीदेखील पाणीपुरीच्या प्रेमात, Video पाहून व्हाल अवाक्


PaniPuri: या प्राण्याचा पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Trending Video: गायीनंतर आता हत्तीदेखील पाणीपुरीच्या प्रेमात,  Video पाहून व्हाल अवाक्

Viral Video : सोशल मीडियावर (Social media) एकशे एक भन्नाट व्हिडीओ (Video) पाहिला मिळतात. हे व्हिडीओ आपला दिवसभराचा ताण नाहीसा करतात. अशातच जर भूक लागली की आपल्यापैकी अनेकांना चाट पदार्थांवर ताव मारायला आवडतो. कोणाला भेळपुरी, शेवपुरी, सुकी भेळ आवडते आणि पाणीपुरी म्हणजेच गोलगपा याची जादू तर देशात काय परदेशातही पाहिला मिळते. 

पाणीपुरीवर मनसोक्त ताव मारताना आपण अनेकांना पाहिलं आहे. या पाणीपुरीच्या प्रेमात काही दिवसांपूर्वी आपण एका गाय आणि वासराला (cow and calf) पाहिलं होतं. आता पाणीपुरी खाण्याचा मोह अजून एका प्राण्याला आवरता आला नाही. सध्या या प्राण्याचा पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (elephant eating panipuri Trending Video on Social media nmp)

क्या बात है! 

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) होत असलेला या व्हिडीओमध्ये चक्क एक हत्ती पाणीपुरीवर ताव मारताना दिसतोय. पाणीपुरीवाला या हत्तीला (elephant ) पाणीपुरी देतोय आणि हत्तीदेखील या पाणीपुरीचा मनमुराद आस्वाद घेतोय. या हत्तीला पाणीपुरी इतकी आवडली की तो इथून हलायचं नावच घेत नव्हता. व्हायरल व्हिडिओ हा आसामच्या तेजपूरमधील असल्याचं सांगण्यात येतंय. 

पाहा मजेशीर व्हिडीओ

Read More