Marathi News> भारत
Advertisement

Dinosaur Rare Egg : 'अंडे में अंडा',भारतात सापडलं डायनासोरचं दुर्मिळ अंड

भारतात  डायनासोरची दुर्मिळ अंडी सापडली आहेत. ही दुर्मिळ अंडी पाहुन सर्व चक्रावले आहेत.  

Dinosaur Rare Egg : 'अंडे में अंडा',भारतात सापडलं डायनासोरचं दुर्मिळ अंड

नवी दिल्ली : डायनासोर हा एकमेव असा प्राणी आहे ज्याचे प्रत्येकालाचं खुप कुतूहल आहे. कारण खुप कमी जणांनी या प्राण्याबद्दल माहिती आहे आणि पाहिलेय, अथवा डायनासोरला ज्यांनी पाहिलंय त्यांचा मृत्यूदेखील झालेत. आता याचं प्राणीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. भारतात  डायनासोरची दुर्मिळ अंडी सापडली आहेत. ही दुर्मिळ अंडी पाहुन सर्व चक्रावले आहेत.  

दिल्ली विद्यापीठाच्या संशोधकांनी मध्य प्रदेशात डायनासोरची एक अतिशय विचित्र अंडी शोधून काढली आहे. या अंड्याच्या आत एक अंडे देखील आहे. डायनासोरच्या अंडीचा हा प्रकार बहुधा जीवाश्मांच्या इतिहासात पहिल्यांदाच सापडलाय. 
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हा अंडी दुर्मिळ आहेत, कारण आतापर्यंत सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये अंड्यात अंड अशी अंडी सापडलेली नाहीत. त्यामुळे ही फार दुर्मिळ अंडी आहेत.  

कुठे सापडलं दुर्मिळ अंड?
मध्य भारतातील अप्पर क्रेटेशियस लॅमेटा फॉर्मेशन डायनासोर जीवाश्म शोधण्यासाठी फार पूर्वीपासून ओळखले जाते. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील बाग परिसरात शास्त्रज्ञांना असामान्य टायटॅनोसॉरिड डायनासोरची अंडी सापडली होती. बाग शहराजवळील एका गावात संशोधकांना मोठ्या संख्येने टायटॅनोसॉरिड सॉरोपॉडची घरटी सापडली. एका घरट्यात संशोधकांना 10 अंडी सापडली, त्यातील एक अंड फारचं दुर्मिळ होते. या अड्यात अंड होते. या अंड्याला दोन गोलाकार कवच होते, दोन कवचांमध्ये अंतर होते. जे ovum-in-ovo (दुसऱ्या आत एक अंडे) सारखे होते.

हा शोध लागणार?
संशोधकांचे म्हणणे आहे की, डायनासोरचे पुनरुत्पादक जीवशास्त्र कासव, सरडे किंवा मगरी आणि पक्ष्यांसारखे आहे की नाही हे ही अंडी उघड करू शकतात. 

संशोधनाचे प्रमुख लेखक आणि DU संशोधक डॉ. हर्ष धीमान म्हणतात की, टायटॅनोसॉरिडच्या घरट्यांमधून ओव्हम-इन-ओव्हो अंड्यांचा शोध असे सूचित करतो की सॉरोपॉड डायनासोरमध्ये मगरी किंवा पक्ष्यांसारखेच बीजांडाचे आकारशास्त्र असावे. तसेच त्यांनी पक्ष्यांची अंडी घालण्याचे वैशिष्ट्य अंगीकारले होते.

दरम्यान ही दुर्मिळ अंडी भारतात फारचं चर्चेचा विषय ठरली आहेत. या अंड्यातून नेमकं काय संशोधन समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read More