Marathi News> भारत
Advertisement

Edible Oil Price Hike: युद्धाचा परिणाम थेट स्वयंपाकघरावर, सर्वसामन्यांना बसणार झटका

Edible Oil Hike : रशियाकडून यूक्रेनवर हल्ले सुुरु आहेत. यू्क्रेनदेखील रशियाला उत्तर देत आहे. पण आता याचा परिणात थेट स्वंयपाकघरावर होत असताना दिसत आहे.

Edible Oil Price Hike: युद्धाचा परिणाम थेट स्वयंपाकघरावर, सर्वसामन्यांना बसणार झटका

Edible Oil Price News :  रशिया-युक्रेनदरम्यान सुरु असलेल्या संघर्षामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. पॅकबंद पामतेल, सूर्यफूल, सोया, वनस्पती तेलाच्या किमती सणापूर्वीच वाढल्या आहेत. या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही लवकरच याचा आढावा घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. (Ukraine Russia war affect on Oil price)

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आता सर्वत्र दिसून येत आहे. आधी कच्चे तेल, मग रोजच्या काही गोष्टींसह, आता या युद्धाचा परिणाम स्वयंपाकघरावरही दिसून येत आहे. एकीकडे युक्रेनवर रशियाचा अथक हल्ला आणि दुसरीकडे सणासुदीच्या काळात वाढती मागणी यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.

पॅकबंद पामतेल, सूर्यफूल, सोया आणि वनस्पती तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र, यावेळी मोहरीच्या तेलाच्या दरात फारसा बदल झालेला नाही. ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. याबाबत ग्राहक व्यवहार मंत्रालयाने यापूर्वी दोन बैठका घेतल्या आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्याचा आढावा घेतील, अशी अपेक्षा आहे.

किमती किती वाढल्या?

15 फेब्रुवारी ते 5 मार्च या अवघ्या 20 दिवसांचा विक्रम पाहता या तेलांच्या किमती 10 ते 36 रुपयांनी वाढल्या आहेत. दिल्लीत 132 रुपयांना विकल्या जाणाऱ्या पामतेलाच्या दरात 28 रुपयांनी वाढ झाली आहे. म्हणजेच आता यासाठी लोकांना 160 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईमध्ये 13 रुपयांनी, ओडिशातील कटकमध्ये 23 रुपयांनी आणि चेन्नईमध्ये 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचवेळी आंध्र प्रदेशातील कर्नूलमध्ये 35 रुपयांनी तेल महाग झालं आहे.

पॅकबंद सोया तेलाचे दर

सोया तेलही या महागलं आहे. दिल्लीत त्याची किंमत 157 रुपये होती, ती वाढून 179 रुपये प्रति लिटर झाली आहे. कोलकात्यात 17 रुपये, हैदराबादमध्ये 14 रुपये, बरेलीमध्ये 25 रुपये आणि हिमाचल प्रदेशच्या बिलासपूरमध्ये 22 रुपयांनी दर वाढले आहे. या वाढीचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार हे उघड आहे.

पॅकबंद वनस्पती तेलाच्या किमतीही बहुतांश शहरांमध्ये वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीत वनस्पती तेलाच्या किमतीत 20 रुपयांनी, श्रीनगरमध्ये 25 रुपयांनी, पाटण्यात 20 रुपयांनी आणि बंगळुरूमध्ये 23 रुपयांनी वाढ झाली आहे. उत्तराखंडच्या हल्दवानीमध्ये किंमत 59 ते 195 रुपयांनी वाढली आहे. भुवनेश्वर, कोईम्बतूर येथेही सुमारे 30 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Read More