Marathi News> भारत
Advertisement

नीरव मोदीची ५६ करोडोंची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्टनुसार संपत्ती जप्त करण्याचा आदेश

नीरव मोदीची ५६ करोडोंची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीनं नीरव मोदीवर कारवाई केलीय. हीरे व्यावसायिक असलेल्या नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेच्या १३ हजार कोटींच्या फसवणुकीचा आरोप आहे. या प्रकरणात मोदीला फरार घोषित करण्यात आलंय. त्यानंतर नीरव मोदीच्या दुबईस्थित ११ संपत्यांवर टाच आणलीय. या संपत्तीची किंमत ५६ करोड रुपयांहून अधिक असल्याचं सांगण्यात येतंय. 

जप्त करण्यात आलेली संपत्ती नीरव मोदी आणि त्याच्या समुहाची कंपनी मेसर्स फयारस्टार डायमंड एफझेडईच्या आहेत, अशी माहिती मंगळवारी ईडीनं दिलीय. 

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्टनुसार संपत्ती जप्त करण्याचा आदेश ईडीनं दिले. गेल्या महिन्यात केंद्रीय एजन्सीनं नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या ६३७ करोड रुपयांची संपत्ती जप्त केली होती. यामध्ये न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कस्थित दोन अपार्टमेंटचाही समावेश आहे. 
 

Read More