Marathi News> भारत
Advertisement

परिस्थिती गंभीर! Amazon, Flipkart वरून ऑर्डर करण्यापूर्वी हे वाचाच; BIS चा ई-कॉमर्स कंपन्यांना दणका

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम मॉलसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांना दणका; सदोष वस्तू विकल्याचा दावा 

परिस्थिती गंभीर! Amazon, Flipkart वरून ऑर्डर करण्यापूर्वी हे वाचाच; BIS चा ई-कॉमर्स कंपन्यांना दणका

नवी दिल्ली: केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने Amazon, Flipkart आणि Paytm मॉलसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांना आणि भारतीय मानक ब्युरो (BIS) मानकांची पूर्तता न करणारे प्रेशर कुकर विकल्याबद्दल अनेक विक्रेत्यांना नोटीस पाठवली आहे.

कंपन्यांकडून 7 दिवसांत उत्तर मागितले

CCPA ने 18 नोव्हेंबर रोजी या ई-कॉमर्स कंपन्या आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रेशर कुकर ऑफर करणाऱ्या विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या. त्याच्यावर BIS मानकांची पूर्तता न करणारे कुकर विकल्याचा आरोप आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, सीसीपीएने या प्रकरणी स्वतःहून दखल घेत कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना सात दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे

देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने CCPA ने सदोष गुणवत्तेच्या बनावट उत्पादनांविरुद्ध देशव्यापी मोहीम चालवली आहे. एका अधिकाऱ्याने म्हटले की ई-कॉमर्स कंपनी मानकांची पूर्तता न करणारी उत्पादने कशी विकू शकते.

अशा कंपन्यांनी मानकांची पूर्तता केल्यानंतरच विक्रेत्यांना प्लॅटफॉर्मवर उत्पादने विकण्याची परवानगी द्यावी. त्यांनी आपला व्यवसाय जबाबदारीने चालवावा.

बनावट उत्पादनांविरुद्ध मोहीम

याबाबत सीसीपीएने सर्व जिल्ह्यांना यापूर्वीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर उत्पादनाची विक्री आणि ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, असे म्हटले आहे.

यासोबतच CCPA ने ग्राहकांना जागरूक करण्यासाठी आणि ग्राहकांना ISI दर्जेदार उत्पादने खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी अनेक मोहिमा देखील चालवल्या आहेत.

Read More