Marathi News> भारत
Advertisement

धक्कादायक बातमी, पेटत्या रावणाचा पुतळा लोकांवर कोसळला आणि...

Ravan Dahan 2022: पेटत्या रावणाचा पुतळा लोकांवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  

 धक्कादायक बातमी, पेटत्या रावणाचा पुतळा लोकांवर कोसळला आणि...

Ravan Dahan 2022: पेटत्या रावणाचा पुतळा लोकांवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दसऱ्याला रावणाचा पुतळा आणि मेघनाथ, कुंभकरणाचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी रावणाचा पुतळा पेटत असताना खाली कोसळला. यावेळी काही लोक पुतळ्या जवळ उभे होते. या लोकांनी वेळीच पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली. पण, आगीचे चटके लागल्याने काहीजण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ही घटना हरियाणाच्या यमुनानगरमध्ये घडली. (Dussehra 2022 : A major accident in Yamunanagar)

हरियाणातील यमुनानगर येथे रावणदहन दरम्यान मोठी दुर्घटना टळली. येथे रावणाचा पुतळा लोकांच्या अंगावर पडला. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत. हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान रामाने या दिवशी रावणाचा वध केल्यामुळे, वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण म्हणून दरवर्षी दसरा साजरा केला जातो. कोविड-19 महामारीमुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर रावणाच्या पुतळ्याचे दहन करुन हा सण देशभरात उत्साहात साजरा केला गेला. 

यमुनानगरमधील अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. हा पुतळा लोकांच्या अंगावर पडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कुणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही, त्यामुळे जखमींना अधिकृत दुजोरा देता येणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेल टाऊन येथील दसरा मैदानावर पुतळ्याजवळ अनेक लोक शुभशकून म्हणून जळणारी लाकडे घेण्यासाठी गेले असताना ही घटना घडली.

Read More