Marathi News> भारत
Advertisement

चंद्रग्रहण सुरू असताना भाविकांचं सुरू होतं तीर्थक्षेत्रं स्नान

अयोध्येमध्ये राम मंदिराचा परिसर शुक्रवारी दुपारापासूनच रिकामा झाला होता

चंद्रग्रहण सुरू असताना भाविकांचं सुरू होतं तीर्थक्षेत्रं स्नान

वाराणसी : शतकातील सर्वात मोठं चंद्रगहण पार पडत असताना अनेक भाविकांनी तीर्थक्षेत्री स्नान केंलं. वाराणसीमध्ये गंगा नदीमध्ये अनेक नागरिकांनी स्नान केलं. इकडं राज्यात नाशिकमध्ये पंचवटीमध्येही भाविकांनी गोदावरीत डुबकी मारली. ग्रहण काळात अनेक श्रद्धा, अंधश्रद्धा प्रचलीत आहेत.  आजही ग्रहण काळात अनेकजण आहार विहाराबाबत आणि जपतप बाबत काटेकोर असतात. पारंपरिक नियम पाळताना दिसतात. अनेकांनी नदी पवित्र मानून आवर्जून स्नान केलं. वाराणसीमध्ये ग्रहणानिमित्त शुक्रवारी दुपारीच गंगाआरती करण्यात आली होती

दरम्यान, या ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील मंदिरं लवकर बंद करण्यात आली. अयोध्येमध्ये राम मंदिराचा परिसर शुक्रवारी दुपारापासूनच रिकामा झाला होता. 

ग्रहणांबाबत अनेक श्रद्धा-अंधश्रद्धा आजही प्रचलित आहेत. ग्रहणाचे वेध लागल्यावर देवाचं दर्शन घेऊ नये, असं सांगितलं जातं. त्यामुळेच खग्रास सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असेल तर मंदिरं लवकर बंद केली जातात.

Read More