Marathi News> भारत
Advertisement

लग्नात नवदेवासोबत मस्करी करणं नववधूला पडलं महागात, पुढे जे घडलं ते एकदा पाहाच

कोणता व्हिडीओ सोशल मीडियाच्या जगात कधी कसा व्हायरल होईल हे काही आपल्याला सांगता येणार नाही.

लग्नात नवदेवासोबत मस्करी करणं नववधूला पडलं महागात, पुढे जे घडलं ते एकदा पाहाच

मुंबई : कोणता व्हिडीओ सोशल मीडियाच्या जगात कधी कसा व्हायरल होईल हे काही आपल्याला सांगता येणार नाही. इंटरनेटचं जग हे असं आहे की, नेहमीच लोकांना काहीतरी नवीन पाहायला मिळत असतं. इथे कधी-कधी असे व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून आपल्याला आपलं हसू आवरणार नाही, तर कधी-कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या असाच एक व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. जो वधू-वराशी संबंधित आहे.

परंतु लग्नामधील हा व्हिडीओ फारच धक्कादायक व्हिडिओ आहे. ज्याला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.

आपल्याला हे माहित आहे की लग्न म्हटलं की मजा, मस्ती सारख्या गोष्टी येतात. त्यात कधी वधू-वरांचे मित्र त्यांच्यासोबत मस्ती करतात. तर काही वेळा वधू किंवा वर एकमेकांची लग्नादरम्यान मस्करी करतात. ते जे काही करतात ते गंमतीने करतात. ज्यामुळे त्यांच्या लग्नातील प्रत्येक क्षण त्यांच्या लक्षात राहावा.

परंतु या व्हिडीओमधील नववधूला होणाऱ्या नवरदेवासोबत अशी मस्करी करणं भलतंच महागात पडलं आहे. ज्यानंतर ही नववधू ही गोष्ट कधीही विसरु शकणार नाही आणि तिला या मस्करीवरती आयुष्यभर पश्चाताप होईल.

व्हायरल होत असलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये स्टेजवर वधू आणि नवरदेव वरमालाचा विधी पार पाडत असतात. यामध्ये नववधू नवरदेवाच्या गळ्यात पटकन हार घालते. परंतु जेव्हा नवरदेवाची नववधूला हार घालण्याची वेळ येते, तेव्हा मात्र नववधू नवरदेवासोबत मस्करी करते आणि त्याला हार घालू देत नाही.

परंतु नवरदेवाला वधूची ही मस्करी सहन होत नाही आणि तो त्याच्या जवळ उभ्या असलेल्या एका तरुणीच्या गळ्यात हार घालून मोकळा होतो. हा व्हिडीओ आश्चर्यकारक आणि तितकाच मजेदार देखील आहे. नवरदेवाचा इतका उतावळापणा हा खरोखरच मनोरंजक आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओ bhutni_ke_memes या अकाउंटवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरती अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओवरती लोकांनी अनेक मजेदार कमेंट्स देखील केल्या आहेत.

Read More