Marathi News> भारत
Advertisement

अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानात भारतीय विद्यार्थ्याने केली लघुशंका; दिल्लीत अटक

American Airlines : गेल्या वर्षी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा याने बिझनेस क्लासमधील एका महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. यावेळी आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्यानंतर पुन्हा असाच काहीसा प्रकार समोर आला आहे  

अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानात भारतीय विद्यार्थ्याने केली लघुशंका; दिल्लीत अटक

Passenger Urinated In Flight :  गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये (Flight) होत असलेल्या गैरप्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काही वेळा विमान हवेतच असताना प्रवाशांची इतर प्रवाशांसोबत किंवा केबिन क्रूसोबत हाणामारी झाल्याचे आपण अनेकदा वाचलं असेल. काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या (Air India) विमानात एका वृद्ध महिलेवर मुंबईच्या मद्यधुंद शंकर मिश्रा याने लघुशंका केली होती. शंकर मिश्रा यास पोलिसांनी अटक केली होती. आणखी एका प्रकरणात एका व्यक्तीने महिलेच्या ब्लँकेटवर लघुशंका केली होती. या प्रकरणात आरोपीने लेखी माफी मागितल्यानंतर प्रकरण मिटले होते. त्यानंतर आता पुन्हा असाच काहीसा प्रकार घडलाय.

एअर इंडियाच्या विमानात लघुशंकेची घटना ताजी असतानाच आणखी एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने लघवी केली. यानंतर तो सहप्रवाशाच्या अंगावर पडला आहे. 3 मार्च रोजी हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अमेरिकन विद्यापीठाचा विद्यार्थी दारुच्या नशेत विमानातून प्रवास करत होता. झोपेत असतानाच त्याने दुसऱ्या प्रवाशावर लघुशंका केली. वेळीच विद्यार्थ्याने प्रवाशाची माफी मागितली. मात्र विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच त्याला ताब्यात घेण्यात आले.

वृत्तानुसार,  ही संपूर्ण घटना AA292 अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाईटमध्ये घडल्याचे म्हटले जात आहे. शुक्रवारी रात्री 9:16 वाजता या विमानान न्यूयॉर्कहून उड्डाण घेतले आणि 14 तास 26 मिनिटांनी शनिवारी रात्री 10:12 वाजता दिल्लीच्या दिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. आरोपी हा अमेरिकेतील विद्यापीठाचा विद्यार्थी असून त्याने मद्यधुंद अवस्थेत झोपेत लघवी केली होती. मात्र आपण हे जाणूनबुजून केले नाही. झोपेत लघवी बाहेर पडली आणि सहप्रवाशावर पडली, असे या विद्यार्थ्याने म्हटले आहे.

केबिन क्रूकडे तक्रार केल्यानंतर विद्यार्थ्याने याबद्दल माफी मागितली. त्यानंतर पीडित प्रवाशाने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. मात्र, विमान कंपनीने ते गांभीर्याने घेत आयजीआय विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) कळवले. एटीसीने सीआयएसएफ कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर विमान उतरताच विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले.

Read More