Marathi News> भारत
Advertisement

रशियन Sputnik V लशीची किंमत जाहीर; लवकरच बाजारात उपलब्ध

भारतात कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन नंतर आता स्पुटनिक वी ही लस देखील बाजारात उपलब्ध असणार आहे

रशियन  Sputnik V लशीची किंमत जाहीर; लवकरच बाजारात उपलब्ध

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन नंतर आता स्पुटनिक वी ही लस देखील बाजारात उपलब्ध असणार आहे. भारतात स्पुटनिक वी आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने या लसीची किंमत 1000 रुपये जाहीर केली आहे.

स्पुटनिक वी लशीच्या एका मात्रेची किंमत 995.4 रुपये असणार आहे. आय़ात केलेल्या स्पुटनिक वी ची किंमत 948 रुपये आहे. यावर 5 टक्के GSTलागणार आहे. भारतात स्पुटनिक वी लशीचे उत्पादन सुरू झाल्यानंतर तिची किंमत कमी होऊ शकते.

1 मे रोजी भारतात स्पुटनीक लशीची पहिली खेप पोहचली होती. दुसरी खेप 1-2 दिवसात भारतात दाखल होणार आहे. डॉ. रेड्डीज लॅबने म्हटले आहे की,13 मे रोजी सेंट्रल ड्रग्ज रेग्युलटरी कडून या लशीला परवानगी देण्यात आली आहे. लशीचे लॉंचिंग करताना डॉ. रेड्डीज लॅबने शुक्रवारी हैद्राबाद येथील व्यक्तीला पहिली मात्रा दिली.

भारतात दाखल होणार रशियाच्या Sputnik V लसीची दुसरी खेप

भारतात लवकरच रशियाची स्पुतनिक व्ही लसची दुसरी खेप पोहोचणार आहे. मॉस्को येथील भारतीय राजदूत बाला वेंकटेश वर्मा यांच्या मते, उद्या शुक्रवारी रशियाने विकसित केलेल्या या लसीचे दीड ते दोन लाख डोस भारताला मिळतील. रेडडी लॅबला ही लस आयात करण्यासंदर्भात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी भारताने यापूर्वीच परवानगी दिली आहे. 

रशियाची ही लस भारतात सुरू असलेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात खूप मदत करेल. असा विश्वास आहे की यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होईल.

स्पुतनिक-व्ही ही भारत सरकारकडून वापरण्यास देण्यात आलेली तिसरी लस आहे. तत्पूर्वी, सरकारने कोविशिल्ड आणि कोवाक्सिन वापरण्यास परवानगी दिली. भारत बायोटेकची कोविशील्ड सीरम इन्स्टिट्यूटमध्ये विकसित केली गेली आहे. महत्त्वाचे म्हणजे स्पुतनिक व्ही लसची पहिली खेप या महिन्याच्या सुरूवातीस रशियाकडून पाठविली गेली होते.

Read More