Marathi News> भारत
Advertisement

डॉलरचा भाव ७३ रुपये ३४ पैशांवर जाऊन धडकला

डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा घसरला

डॉलरचा भाव ७३ रुपये ३४ पैशांवर जाऊन धडकला

मुंबई : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर उघडलेल्या भारतीय चलन बाजारात आज डॉलरचा भाव ७३ रुपये ३४ रुपयांवर जाऊन धडकला आहे. रुपयाच्या घसरणीनं आता निचांकी पातळी गाठली असून आज डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल ४३ पैसे घसरला आहे. सोमवारी ७२ रुपये ९१ पैशावर बंद झालेला डॉलर आज बाजार उघडताच वधारला आणि रुपयानं ७३ रुपयांची पातळी ओलांडली.

२० वस्तूंच्या आयात शुल्कात दुपटीनं वाढ

रुपयाची घसरण रोखण्याचे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे उपाय निष्फळ ठरताना दिसत आहेत. रुपयाची घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नुकतेच २० वस्तूंवरील आयात शुल्कात दुपटीनं वाढ केली. त्यामुळे अनावश्यक आयातीवर नियंत्रण आणून डॉलर मागणी कमी करण्यास मदत होईल असा सरकारचा अंदाज आहे. पण प्रत्यक्षात रुपयावर त्याचा परिणाम होईपर्यंत ही डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच राहण्याची चिन्ह आहेत.

आंतरराष्ट्रीय तणाव

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार क्षेत्रामध्य़े सुरु असलेला तणाव तसेच अर्जेंटिना आणि तुर्कस्तान यांच्यावर आलेलं संकट आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे रुपयाची पडझड सुरु आहे.

रुपयाची विक्रमी पडझड

गेल्या काही दिवसांपासून रुपयाची ही विक्रमी पडझड सुरुच आहे. आणखी काही दिवसही ही पडझड सुरूच राहण्याची शक्यता आहे. तेल आणि पेट्रोलियम वस्तूंच्या आयातीचा खर्च देखील यामुळे वाढणार आहे. याचा सरळ परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे.

Read More