Marathi News> भारत
Advertisement

Diwali Stocks: यंदाच्या वर्षीच्या दिवाळीत करा या शेअर्सची खरेदी; मागणी दमदार, फायदा जोरदार

शेअर बाजारात तर फेस्टीव्ह मूड चांगलाच रंगात आला आहे

Diwali Stocks: यंदाच्या वर्षीच्या दिवाळीत करा या शेअर्सची खरेदी; मागणी दमदार, फायदा जोरदार

मुंबई : नवरात्र, दसऱ्यानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजे दिवाळीचे. दिवाळीची सुरुवात होण्यापूर्वीच बऱेच दिवस आधीपासून या सणाचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. शेअर बाजारात तर फेस्टीव्ह मूड चांगलाच रंगात आला आहे. दर दिवशी शेअर बाजारात नवे विक्रम प्रस्थापित केले जात आहेत. कुठं सेंसेक्स 62 हजारांवर पोहोचत आहे, तर कुठे निफ्टीसुद्धा 18500 च्या आसपास पोहोचला आहे. 

दिवाळीच्या आधी शेअर मार्केटमध्ये हाय वॅल्युएशन पाहता अनेक गुंतवणुकदारांना बाजाराची नेमकी दिशा काय असेल याबद्दल संभ्रम आहे. पण, हा संभ्रम काही अंशी दूर करण्यासाठी झी बिजनेसच्या संपादकपदी असणाऱ्या अनिल सिंघवी यांनी निर्मल बंग सिक्योरिटीजच्या सीईओ राहुल अरोरा यांच्याकडून महत्त्वाची माहिती घेत सर्वांनाच याबाबतचं मार्गदर्शन केलं आहे. 

निफ्टी लवकरच 20 हजारांवर... 
राहुल अरोरा यांच्या मते बाजारात सध्या कोणताही तणाव नाही. शेअर मार्केटमध्ये डोमेस्टीक लिक्वीडीटी चांगल्या प्रमाणात असल्यामुळे ती बाजार कोलमडू देणार नाही. सध्याच्या घडीला बाजारात जवळपास 1.5 लाख कोटींची लिक्वीडीटी बाजारात आहे. मागील काही दिवसांपासून एक बाब निरीक्षणात आली आहे की ज्या दिवशी शेअर बाजार कोलमडतो, त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो वधारतो. हे सर्व चित्र पाहता येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये निफ्टी 20 हजारांची उंचीही पाहू शकतो. 

पैसा नेमका कुठे वाढत आहे, यावर गुंतवणुकदारांची नजर आहे. ते आवडीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करत आहेत. ज्यामुळं या घडीला चिंतामुक्त होऊन शेअर्सची खरेदी करत ते दीर्घ काळासाठी बाळगावेत असाच सल्ला तज्ज्ञांनी दिली आहे. येत्या काळात Indian Hotels, Bata India, PVR, Inox, Westlife Development आणि Whirlpool यांसारखे शेअर्स दमदार परतावा देतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Read More