Marathi News> भारत
Advertisement

Sapna Choudhary: भर कार्यक्रमात तरूणाचं अनैतिक कृत्य, सपनाने चांगलीच अद्दल घडवली!

Sapna Choudhary Dance: कार्यक्रम सुरू असताना लागलेल्या गाण्यावर सपना नाचू लागते. तिचा डान्स पाहून उभ्या असलेले तरुण बेभान झाले अन्..  

Sapna Choudhary: भर कार्यक्रमात तरूणाचं अनैतिक कृत्य, सपनाने चांगलीच अद्दल घडवली!

Sapna Choudhary Viral Video: हरियाणाची सुपरस्टार सपना चौधरीला (Sapna Choudhary) आता कोण ओळखत नाही, असं फारच क्वचित पहायला मिळतं. तिच्या नावाचा आणि डान्सचा जलवा आजही कायम आहे. तिचे नवीन तसेच जुने व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल होत असतात. आता सपनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालतोय, ज्यामध्ये सपना लाल रंगाच्या सूटमध्ये स्टेजवर डान्स करताना दिसत आहे.

हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरी आज देश विदेशात प्रसिद्ध आहे. सपना चौधरीच्या डान्सवर (Sapna Choudhary Dance) कोट्यवधी लोकांची मनं जिंकली. सपनाची प्रत्येक शैली चाहत्यांच्या मनात घर करते. त्यामुळेच सपनाला मोठी रक्कम देखील मिळते. अशाच एका कार्यक्रमात सपनाला बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी एक धक्कादायक प्रकार घडला.

आणखी वाचा- तरूणपणात महिला भाडेकरूसोबतचं अफेर पोलिसाला पडलं महागात, तिने त्याचं...

कार्यक्रम सुरू असताना लागलेल्या गाण्यावर सपना नाचू लागते. तिचा डान्स (Sapna Choudhary Viral Video) पाहून उभ्या असलेले तरुण बेभान झाले आणि काही तरुणांनी तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका तरूणाने तिच्यावर पैसे उधळले. त्यावेळी त्याने सपनासोबत अनैतिक कृत्य देखील केलं. त्यामुळे सपना चांगलीच संतापली. 

पाहा व्हिडीओ- 

दरम्यान, कार्यक्रमाच्या आयोजकाने तरुणाला हाकलून लावलं. मात्र, तरुण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहून काही आयोजक तरुणांनी त्याला चांगलाच चोप दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सपना डान्स चांगलाच गाजला आणि अनेकांनी तिचं कौतूक देखील केलंय.

Read More