Marathi News> भारत
Advertisement

पोलीस कर्मचाऱ्याने फिल्मी स्टाईलने चोरट्याला घेतले ताब्यात; अटकेचा थरार कॅमेरात कैद

Viral Video : साखळीचोर हवालदाराला हुलकालवणी देऊन पळण्याचा प्रयत्नात होता मात्र पोलीस कर्मचाऱ्यांने शिताफीने त्याला अटक केली

पोलीस कर्मचाऱ्याने फिल्मी स्टाईलने चोरट्याला घेतले ताब्यात; अटकेचा थरार कॅमेरात कैद

Viral Video : व्यावसायिक जीवनाव्यतिरिक्तही पोलीस (Delhi Police) हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक धोके पत्कारताना दिसतात. अनेकदा पोलिसांची त्यांच्या परिसरातील गुन्हेगांरांची कायमच नजर असते. अशाच एका पोलीस कर्मचाऱ्याची धाडसी कारवाई कॅमेरामध्ये रिकॉर्ड झालीय. या पोलीस अधिकाऱ्याने एका साखळी चोराला (Chain Snatcher) बाईकवरुन पळ काढताना अटक केलीय. या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

दिल्ली पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दिल्लीतील एका धाडसी पोलीस हवालदाराने सारखी चोराला अगदी शिताफिने पकडलं आहे. या गुन्हेगाराच्या अटकेनंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांना 11 रखडलेल्या प्रकरणांमध्ये महत्त्वाची माहिती मिळाली. हवालदारच्या धाडसामुळे एका महिलेचा हार चोरीला जाण्यापासून वाचला. शाहबाद डेअरी पोलीस ठाण्याने या साखळी चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. चोरट्याला शोधण्यासाठी हवालदार सत्येंद्र घटनास्थळी पोहोचले होते.

साखली चोराने पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, हवालदार बाईकवरुनच त्याचा शर्ट पकडून त्याला पाडले. चालत्या बाईकवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला असं काही होईल वाटलेही नसेल. "आपल्या जीवाची पर्वा न करता शाहबाद डेअरी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सत्येंद्र यांनी एका साखळी चोराला अटक केली. या चोराच्या अटकेने 11 प्रकरणांची उकल झाली. कायदेशीर कारवाई सुरू आहे," असे दिल्ली पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

साखळी चोर दुसऱ्या बाजूने येत असतानाच गुन्हेगाराला पाहताच हवालदाराने आपली बाईक स्लो  केली. पोलिसांना पाहताच गुन्हेगाराने घाबरून घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण हवालादाराने धाडसाने या चोराला अटक केलीय.

या व्हिडिओला हजाराहून अधिक व्ह्यूज आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. अनेकांनी या पोलिसाला त्याच्या शौर्याबद्दल सन्मानित करावे अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

Read More