Marathi News> भारत
Advertisement

Delhi Metro मध्ये सुमधूर आवाजात तरुणाने गायलं नुसरत फतेह अली खान यांचं गाणं; Video पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल!

Delhi Metro Viral Video: तुमच्याही आयुष्यात लय टेन्शन असेल ना... तुम्हाला अशा माणसाचा व्हिडिओ दाखवणार आहोत ज्याच्या गायनाच्या प्रतिभेने सहप्रवाश्यांना खरोखर मंत्रमुग्ध केलंय.

Delhi Metro मध्ये सुमधूर आवाजात तरुणाने गायलं नुसरत फतेह अली खान यांचं गाणं; Video पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल!

Delhi Metro Viral Video: गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली मेट्रो म्हणजे प्रवासाचं नाही तर एक मनोरंजनाचं ठिकाण झालं आहे. अनेकदा दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. डीएमअरसी दिल्ली मेट्रोने वारंवार आवाहन करुनही मेट्रोमध्ये (Delhi Metro) विचित्र व्हिडीओ बनवण्याचे काही कमी होताना दिसत नाही. अशातच आता दिल्ली मेट्रोमधील एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही काहिसा दिलासा मिळेल. 

तुमच्याही आयुष्यात लय टेन्शन असेल ना... तुम्हाला अशा माणसाचा व्हिडिओ दाखवणार आहोत ज्याच्या गायनाच्या प्रतिभेने सहप्रवाश्यांना खरोखर मंत्रमुग्ध केलंय. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसतोय. त्याचबरोबर त्याचे सहप्रवाशी देखील दिसत आहेत. हृतिक नावाचा एक व्यक्ती दिल्ली मेट्रोच्या आत दिसत आहे. व्हिडिओमध्ये, ती नुसरत फतेह अली खान (Nusrat Fateh Ali Khan) यांचं 'सॅनसों की माला' गाताना (Sanson Ki Mala) दिसत आहे, तर त्याचे एक मित्र गिटारवर तिच्यासोबत त्याला साथ देताना दिसत आहेत.

पाहा Video

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला अनेकांनी पसंती दिली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. आत्तपर्यंत या व्हिडिओला 51 हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्याचं दिसतंय. तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर देखील केलाय. तरुणीच्या गळ्यात साक्षात सरस्वती आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी तरूणाचं कौतूक केलंय.

आणखी वाचा - Viral Video: महिलेची पर्स चोरण्याच्या नादात झाली फजिती, ड्राईव्हरने केला गेम; चोराचा रडकुंडी चेहरा बघून पोटधरून हसाल!

दरम्यान, दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले होते. त्यातील मेट्रोमध्ये कपलचं किस (Kissing Video) करणं, त्यानंतर एका व्यक्तीचं तरुणीशेजारी हस्तमैथुन करणं असे अनेक अश्लिल (obscene Video) व्हिडीओही व्हायरल झाले. दिल्ली मेट्रोमध्ये काय सुरु आहे, यावर कोणाचं नियंत्रण नाही का, अगदी दिल्ली महिला आयोगाने हे मेट्रोमधील सर्व व्हिडीओची दखल घेतली होती. 

Read More