Marathi News> भारत
Advertisement

५० आणि २०० च्या नोटांचे पुनरावलोकन करा : दिल्ली हायकोर्ट

दृष्टीहीनांना नोट हाताळताना होणारी अडचण दूर होण्याच्या दृष्टीने वेगाने पाऊले उचलली जात आहेत.

५० आणि २०० च्या नोटांचे पुनरावलोकन करा : दिल्ली हायकोर्ट

नवी दिल्ली : दिल्लीतील उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र आणि भारतीय रिझर्व बॅंकेला नोटा आणि नाण्यांचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले आहेत. 

दृष्टीहीनांना नोट हाताळताना होणारी अडचण दूर होण्याच्या दृष्टीने वेगाने पाऊले उचलली जात आहेत. कार्यवाहक मुख्य न्यायाधीश गीता मित्तल आणि न्यायाधीश सी. हरिशंकर यांच्या पिठाने हे निर्देश दिले.

दृष्टीहिनांना त्रास

केंद्र आणि भारतीय रिझर्व्ह बॅंकेस ५० आणि २०० रुपयांच्या नोटांचे पुनरावलोकन होणार आहे. नोटांची ओळख आणि वापर करताना दृष्टीहिनांना त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.

आपसातच प्रश्न सोडवा 

 नोटांचा आकार आणि छपाईमूळे ही अडचण निर्माण होत आहे. हा प्रश्न तुम्हालाच (सरकार, आरबीआय आणि याचिकाकर्ता) सोडवावा लागणार आहे.

यासंदर्भात अधिकाऱ्यांनी दृष्टीबाधीत विशेषज्ञ आणि संबधितांशी विचार विनिमय करायला हवा असे पिठाने म्हटले आहे. 

नोटांचा आकार का बदलला ?

 तसेच 'नोटांचा आकार पहिल्यासारखा का ठेवला नाही ? ' असा प्रश्न कोर्टाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांना विचारला.

याप्रकरणी १६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. 

Read More