Marathi News> भारत
Advertisement

सिलिंडर स्फोटानंतर भीषण आग, गुदमरुन चार जणांचा मृत्यू

सिलिंडरच्या स्फोटानंतर (cylinder blast) मोठी आग लागली. यावेळी गॅसगळतीने चार जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. 

सिलिंडर स्फोटानंतर भीषण आग, गुदमरुन चार जणांचा मृत्यू

मुंबई : दिल्लीच्या शाहदारा भागात सिलिंडरच्या स्फोटानंतर (cylinder blast) मोठी आग लागली. यावेळी गॅसगळतीने चार जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. तर जण जखमी झाला आहे. ही घटना रात्री उशिरा घडली. जखमीला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (Delhi: Four people died and another person sustained burn injuries in a fire that erupted following a cylinder blast at a house in Farsh Bazar area )

अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग म्हणाले की, ही घटना शाहदराच्या फ्रेश मार्केट भागात घडली. (Farsh Bazar area of Shahdara last night) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास फ्रेश बाजार परिसरातील भीकमसिंह कॉलनीतून एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याचा फोन आला. त्यानंतर अग्निशमन दलाची  वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाली. आग आटोक्यात आणून 5 जणांना वाचविण्यात आले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एलपीजी सिलिंडर फुटल्यामुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरल्यामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 25 टक्के जळल्यामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. त्यांना हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read More