Marathi News> भारत
Advertisement

दिल्ली विधानसभा निवडणूक : मतदानाची तयारी पूर्ण, २,६८९ मतदान केंद्र सज्ज

दिल्ली विधानसभा निवडणूक मतदानासाठी निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणूक : मतदानाची तयारी पूर्ण, २,६८९ मतदान केंद्र सज्ज

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक मतदानासाठी निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. दिल्लीत दोन हजार ६८९ मतदान केंद्र आहेत. ४० हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांना १९ हजार होमगार्डची मदत मिळणार आहे. दिल्लीच्या सिमारेषेवर नाकाबंदी करण्यात येणार आहे. वाहनांची तपासणी केल्यानंतर बाहेरील वाहनांना दिल्लीत प्रवेश दिला जाणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान शनिवार ८ फेब्रुवारी रोजी तर मतमोजणी मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ७०0 सदस्यीय दिल्ली विधानसभेची मुदत २२  फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्याआधी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे.

या निवडणुकीत आम आदमी विरुद्ध भाजप आणि काँग्रेस अशी लढत होत आहे. दोन वेळा दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्याचा पराक्रम 'आप'ने जिंकली आहे. दोन वेळा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झालेत. ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिल्लीच्या जनतेने पुन्हा केजरीवल यांना पसंती देत ६७ जागा जिंकून दिल्या होत्या. त्याच्या जोरावर दिल्लीचा कायापालट करण्याचा प्रयत्न केेला. केजरीवाल यांनी विकासाच्या मुद्यावार ही निवडणूक लढवत आहे. तर भाजपने राष्ट्रीय मुद्दे प्रचारात आणत आणि केजरीवाल यांच्यावर टीकेची झोड उडवली.  भाजपला ही निवडणूक तशी जड जाण्याची शक्यता  घेण्यात आलेल्या निवडणूकपूर्व चाचणीत दिसून येत आहे. भाजपच्या १० ते १२ जागा वाढण्याची शक्यता असली तरी केजरीवाल ५४ ते ५८ जागा जिंकण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 'आप'चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 'हिंदू-मुस्लिम' व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करणे महागात पडले आहे. या व्हिडिओप्रकरणी निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या आधीही आयोगाने केजरीवाल यांना त्यांच्या एका वक्तव्यावरून फटकारले होते. तर  भाजप नेत्यांनाही निवडणूक आयोगाने तंबी दिली आहे. तसेच डीसीपी (DCP) राजेश देव यांनाही चांगलाच दणका दिला आहे. मीडियापासून दूर राहण्याचे सक्त आदेश देताना डीसीपी क्राइम राजेश देव यांना इशारा दिला आहे. त्यांना हटविण्यात यावे, असे स्पष्ट केले आहे. आम आदमी पार्टीचे  (AAP) कार्यकर्ते म्हणून डीसीपी राजेश देव यांनी कपिल गुर्जर यांचे वर्णन केले होते. डीसीपी राजेश देव यांना निवडणूक विषयी कोणतेही काम देऊ नये, असे आपल्या आदेशात निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांना निर्देश दिले होते.

Read More