Marathi News> भारत
Advertisement

भारत-चीन तणाव: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या राज्यसभेत देणार माहिती

एलएसीवर भारत-चीन यांच्यातील तणाव कायम आहे.

भारत-चीन तणाव: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या राज्यसभेत देणार माहिती

नवी दिल्ली : LAC वर एककीडे शांतीचे प्रयत्न सुरु असतान देखील सीमेवर तणाव कायम आहे. भारत-चीन यांच्यातील तणाव कमी होताना दिसत नाहीये. चीन आता लडाखनंतर अरुणाचल सेक्टरमध्ये देखील हत्यारे आणि सैनिकांची संख्या वाढवत आहे. एकीकडे लडाख सीमेवर तणावाचं वातावरण तयार केल्यानंतर चीन आता अरुणाचल भागात ही कुरापती करत आहे.

भारत- चीन यांच्यातील संबंध बिघडत असताना मोदी सरकारने याबाबत एकत्र निर्णय घेण्यासाठी सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी ५ वाजता ही बैठक सुरु झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह प्रत्येक पक्षाचे मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी सर्व पक्षांनी सरकारच्या पाठिशी उभं राहण्याची गरज आहे. संसदेतील अनेक मुद्द्यांवर देखील या बैठकीत चर्चा झाली.

गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारत-चीन तणावाबाबत राज्यसभेत माहिती देणार आहेत. 

Read More