Marathi News> भारत
Advertisement

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोनाच्या विळख्यात

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोनाच्या विळख्यात


मुंबई: कोरोनाची आकडेवारी गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढत आहे. आता गेल्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकारणी, सेलिब्रिटी सर्व स्तरावर कोरोनाचा धोका वाढला आहे. केंद्रामधून एक मोठी बातमी येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय नेते आणि मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. 

रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर राजनाथ सिंह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढचे उपचार घेत आहेत. त्यांनी स्वत: ला होम क्वारंटाइन केलं आहे. याशिवाय संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन देखील केलं आहे. 

राजनाथ सिंह कोरोनावर लवकर मात करून सुखरुप बरे व्हावेत यासाठी सोशल मीडियावर सर्वजण प्रार्थना करत आहेत. कोरोनाचे आकडेवारी वाढत आहे. दुसरीकडे ओमायक्रॉनचा धोका असल्याने अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लावले आहेत. 

देशात आजपासून बुस्टर डोस देण्यासाठी सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक राज्य प्रयत्न करत आहे. देशात कठोर निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्रातील 13 मंत्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. 

Read More