Marathi News> भारत
Advertisement

चित्रपटातील प्रसंग सत्यात उतरवला, तरुणीला मृतदेहाच्या रक्ताचे इंजेक्शन दिले अन्...

Indore Crime News: एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने विकृतीचा कळस गाठला आहे. तरुणीला मृतदेहाच्या रक्ताचे इंजेक्शन देण्यात आले आहे. 

चित्रपटातील प्रसंग सत्यात उतरवला, तरुणीला मृतदेहाच्या रक्ताचे इंजेक्शन दिले अन्...

Indore Crime News: एकतर्फी प्रेमातून भयंकर गुन्हे घडत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. नकार पचवता न आल्याने महिलांवर अॅसिड हल्ले किंवा त्यांच्यावर जीवघेणे हल्ले होतात. मात्र, इंदूर येथे घडलेल्या एका घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. माथेफिरु तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीसोबत भयंकर प्रकार केला आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने युवतीला संक्रमित रक्ताचे इंजेक्शन दिले आहे.

आरोपी तरुणाने या कामासाठी काही गुंडांना सुपारी दिली होती. त्यांनीच भर बाजारात तरुणीला एका मृत व्यक्तीच्या रक्ताचे इंजेक्शन दिले आहे. या प्रकरणी पोलीस या गुंडाचा शोध घेत आहेत. तसंच, या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीला देण्यात आलेले रक्त टीबी रुग्णालयातून चोरण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणात संगीता नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. चार महिन्यांपूर्वी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. मृत्यूच्या आधी त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. मात्र, त्याच्या मृत्यूनंतर बायो मेडिकल वेस्ट म्हणून ते फेकून देण्यात आले होते. संगीताने तेच सँम्पल उचलून आणले आणि तिच्या पतीला दिले. त्याने ते सॅम्पल आरोपी किशोर कोरीला दिले. 

किशोरने तरुणीला मृतदेहाचे रक्त देण्यासाठी दोन जणांना सुपारी दिली होती. आरोपीने रक्ताचे नमुन्यातील काही रक्त एका इंजेक्शनमध्ये भरले होते. त्यानंतर ते इंजेक्शन तरुणीला देण्यासाठी दोन जणांना सुपारी दिली होती. तरुणी एका दुकानात काम करते. तिथेच त्या दोन गुंडानी तिला तिच्या नकळत इंजेक्शन दिले. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तर, आणखी दोन जण फरार आहेत. पोलिसांच्या चौकशीत तरुणीच्या प्रियकरानेच दोन युवकांना सुपारी दिल्याचे त्याने कबुल केले होते. 

अतिरिक्त पोलीस अभिनय विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आय चित्रपट पाहूनच हा कट रचण्यात आला होता. आरोपी किशोर कोरीला तरुणीसोबत लग्न करायचे होते. मात्र, तिने त्याला नकार दिला होता. त्यामुळं त्याने तिला त्रास देण्यासाठी संक्रमण असलेले रक्ताचे इंजेक्शन दिले. जेणेकरुन ती त्याच्याकडे मदतीची मागणी करण्यासाठी येईल आणि तीच्या मनात जागा निर्माण करु शकेल. 

फ्लॅटमध्ये लावली आग 

इंदूरमध्ये हा काही पहिलीच घटना नाहीये. या आधीही एका माथेफिरु आशिकने प्रेयसीच्या घरात आग लावली होती. तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. त्यामुळं तो नाराज होता. त्यामुळं त्याने तिच्या घरातच आग लावली होती. यात तिच्या घराचे खूप मोठे नुकसान झाले होते. 

Read More