Marathi News> भारत
Advertisement

Viral Video : सूनेकडून सासूला धपाधप मारहाण, नातवासोबत सासूच्या 'त्या' कृत्यामुळे...

Viral Video : सासू सुनेच्या हाणामारीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये सुनेने सासूला धपाधप तीन वेळा कानशिलात लगावली आहे. 

 Viral Video : सूनेकडून सासूला धपाधप मारहाण, नातवासोबत सासूच्या 'त्या' कृत्यामुळे...

Shocking Viral Video : कुठल्याही जन्म असो सासू सुनेचं कधीही जमणार नाही. सासू ही सुनेची आई तर सून ही सासूची मुलगी होऊ शकतं नाही. या दोघांमधील वाद आणि भांडणाचे अनेक घटना आपण रोजच्या जीवनात आजूबाजूला पाहत असतो. टीव्ही मालिका असो किंवा चित्रपट यातूनही सासू सुनेच्या नात्यात किती कडवटपणा असतो तेच दाखविण्यात आलं आहे. अपवादाचं काही सासू सुनेचं नात हे आई मुलीसारखं असतं. पण फारच कमी अशी नाती दिसतात. 

सासू सुनेमधील वाद हा काय नवीन विषय नाही. घरात भांडी वाजणारच तसंच त्यांच्यामधील भांडणही होणारच...सासूकडून सुनेला मारहाण करण्यात आल्याचा घटना किंवा त्या घटनांचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे.  (daughter in law slapped mother in law Saas Bahu fight video viral on Internet Trending Video on google now )

संतापजनक व्हिडीओ 

कुटुंब म्हटलं की, चार लोक मग त्यांच्यामध्ये कशा ना कशावरुन मतभेद होतात. कधी कधी त्यांच्यामधील मतभेद विकोपाला जातात आणि भांडण वाढतात. घरातील वडीलधारी मंडळींशी आपण शाब्दिक वाद पाहिला आहे. पण वडीलधारी मंडळीची एखादी गोष्ट खटकली म्हणून त्यांचावर हात उगारणं हे आक्षेपार्ह आहे. सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म Ghar Ke Kalesh या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पाहून संताप होतोय. 

अन् सूनेने सासूच्या कानाशिलात लगावली

या व्हिडीओमध्ये दोन महिला दिसत आहेत. सासू सोफ्यावर बसली आहे आणि सून उभी राहून त्यांच्याशी वाद घालत आहे. या वादामध्ये सासू सुनेच्या कानाखाली मारते. त्यानंतर सूनेने सासूला एक नाही दोन नाही सलग तीन वेळा कानाखाली मारली. एवढंच नाहीत हाणामारी केली. धक्कादायक म्हणजे मुलगा बाजूला उभा राहून हा व्हिडीओ बनवत होता. पण आपल्या पत्नीला हे कृत्य करण्यापासून रोखलं नाही. 

वादामागील कारण काय?

या व्हिडीओमधील सासू सूनेच्या वादामागील कारण ऐकून तर तुम्ही डोक्याला हात मारून घ्या. जरी सूनेने मुलाला जन्म दिला असला तरी आजी आजोबांचा घरातील इतर सदस्यांचा त्या नातव्यावर खूप प्रेम असतो आणि त्याला चूकल्यावर शिक्षा करण्याचा अधिकारही असतो. पण अनेक सूनाना हे आवडतं नाही. हेच कारण या सासूसुनेच्या भांडणाचं ठरलं. आजीने नातवाला खोडसाळपणे मारलं येवढ्याच राग डोक्यात घेऊन सूनेने सासूसोबत वाद घातला. 

सासूला नाही तर त्या महिलेने पहिले नवऱ्यालाही मारहाण केल्याचं त्या व्यक्तीने सांगितलं आहे. या व्हिडीओ आतापर्यंत एक लाख 79 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले असून कमेंट्स बॉक्समध्ये संतापजनक प्रतिक्रिया करत आहेत. 

 

Read More