Marathi News> भारत
Advertisement

धाडसच म्हणावं.. कुत्र्यानं लगावली वाघाच्या कानशिलात; 'हा' Viral Video

Viral Video : इंटरनेटवर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये कुत्रा आणि वाघ यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळत आहे.  

धाडसच म्हणावं.. कुत्र्यानं लगावली वाघाच्या कानशिलात; 'हा' Viral Video

कुत्र्यांचे इतर प्राण्यांशी भांडण करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच वायरल (Viral) होताना दिसत असतात.  तुम्ही पाहिले असतीलच. विशेषत: मांजरी आणि कुत्र्यांमधील भांडण. पण तुम्ही कधी कुत्रा (Dog) आणि वाघाचे (Tiger) भांडण पाहिलं आहे का? नसेल तर हा व्हिडिओ जरूर पहा. (Dare to say The dog got into the tigers ear Viral Video nz)

आणखी वाचा - चापूनचोपून साडी, डोक्यावर पदर घेत कबड्डी खेळणाऱ्या महिलांसमोर 'प्रो कबड्डी'ही फेल... पाहिला का हा Viral Video?

 

इंटरनेटवर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये कुत्रा आणि वाघ यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी अ‍ॅनिमल पॉवर नावाच्या इंस्टाग्राम पेजने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक गोल्डन रिट्रीव्हर कुत्रा वाघाच्या कानाला चावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्या गोल्डन रिट्रीव्हर  कुत्र्याला जाणीव नसावी की तो चक्क वाघाशी लढत आहे.

व्हिडिओमध्ये शेजारी एक सिंह (Lion) बसलेला दिसत आहे. ज्याला लढ्यात सामील व्हायचे नाही. दरम्यान, वाघ कुत्र्याला पंजा देत आहे,  तर कुत्र्याने वाघाचा चेहरा आणि कान घट्ट पकडून ठेवले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘डॉग विरुद्ध टायगर’ (Dog vs Tiger) असे लिहिले आहे.

आणखी वाचा - Being Single : सिंगल राहण्याचेही आहेत अनेक फायदे... जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

हा व्हिडिओ एका प्राणीसंग्रहालयातला (Zoo) आहे कारण काही लोकं देखील त्यांच्या समोरचे दृश्य पाहताना दिसत आहेत. हा व्हिडिओ 4.6 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या दोघांच्या भांडणाने इंटरनेटवरील यूजर्सना धक्का दिला आहे. इंस्टाग्राम (Instagram) यूजर्सनीही या पोस्टवर (Post) अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्या व्हिडिओवर खिल्ली उडवत एका यूजरने ‘माझी पत्नी ॲक्शनमध्ये आहे’ अशी कमेंट (Comment) केली आहे.

Read More