Marathi News> भारत
Advertisement

भावाला पत्नीसोबत गाण्यावर ठेका धरताना पाहून भडकला पती... व्हिडीओ व्हायरल

'दीरासोबत असा डान्स कोणी करत का?', भाऊ आणि पत्नीला एकत्र पाहून भडकलेल्या पतीने घेतला मोठा निर्णय   

भावाला पत्नीसोबत गाण्यावर ठेका धरताना पाहून भडकला पती... व्हिडीओ व्हायरल

मुंबई : लग्न म्हटलं की घरात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं. लग्न घरात फक्त लहान मुलचं नाही ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण खास क्षणांचा आनंद घेत असतो. सध्या लग्नसराई सुरू असून सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याच दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. 

ज्यामध्ये भाऊ आणि वहिनीचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये भाऊ आणि पत्नीचा डान्स पाहून नवऱ्या मुलाला प्रचंड राग येतो. नवीन नवरी आणि नवरदेवाचा डान्स पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटेल. 

व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेवाचा भाऊ राजा हिंदुस्तानी सिनेमातील 'उफ्फ क्या रात आई है' गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. दोघांचा डान्स पाहून नवरदेव डीजेकडे जातो आणि त्याला काही तरी विचारतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर या व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, दीरासोबत असा डान्स कोणी करत का?'. आणखी एका युजरने लिहिलं की, "व्वा काय डान्स केला". अशा अनेक कमेंट्स व्हिडिओवर आल्या आहेत.

Read More