Marathi News> भारत
Advertisement

Cyclone Sitrang : सितरंग चक्रीवादळामुळे Red Alert, महाराष्ट्राच्या 'या' भागावर होणार परिणाम

सितरंग चक्रीवादळ बांगलादेशात रात्री उशिरा देशाच्या नैऋत्य किनारपट्टीवर धडकलं. त्यामुळे 4 राज्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. (Cyclone Sitarang formed in the Bay of Bengal) 

Cyclone Sitrang : सितरंग चक्रीवादळामुळे Red Alert, महाराष्ट्राच्या 'या' भागावर होणार परिणाम

Cyclone Sitrang Latest Update: ऐन दिवाळीत देशावर चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात सीतरंग नावाचं चक्रीवादळ निर्माण झाल्याने जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सितरंग चक्रीवादळ बांगलादेशात रात्री उशिरा देशाच्या नैऋत्य किनारपट्टीवर धडकलं. त्यामुळे 4 राज्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. (Cyclone Sitarang formed in the Bay of Bengal) 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळ निर्माण झालं. रविवारी संध्याकाळी चक्रीवादळात रूपांतरित होऊन बांगलादेश किनारपट्टीकडे सरकल्याची माहिती होती. त्यामुळे ओडीशा, पश्चिम बंगालमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. 

Cyclone Sitarang चा महाराष्ट्रावरही परिणाम -

सीतारंग चक्रीवादळ भारतात कमकुवत झालं असलं तरी अनेक राज्यांमध्ये अलर्ट कायम आहे. 25 ऑक्टोबर 2022 रोजी ओडिशा, बंगाल, मिझोरामसह अनेक भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्राच्या काही भागात याचा परिणाम पहायला मिळू शकतो. कोकण, कर्नाटक, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता आहे.

आणखी वाचा - Cyclone Sitrang: ऐन दिवाळीत चक्रीवादळाचं संकट, हवामान खात्याकडून अलर्ट जारी!

दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे बांग्लादेशमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय. सितरंग चक्रीवादळ बांगलादेशात रात्री उशिरा देशाच्या नैऋत्य किनारपट्टीवर धडकलं. त्याचा परिणाम भारतातील अनेक राज्यांवर झाल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात येतंय.

Read More