Marathi News> भारत
Advertisement

दिलासादायक बातमी : भारतात Coronavirus च्या वेगाला ब्रेक, रुग्णांची संख्या घटली

गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाच्या नव्या केसेसमध्ये लक्षणीय घट 

दिलासादायक बातमी : भारतात Coronavirus च्या वेगाला ब्रेक, रुग्णांची संख्या घटली

नवी दिल्ली : गेल्या एका आठवड्यापासून कोरोना व्हायरस (Corona Virus) संसर्गाच्या घटनांदरम्यान देशाला दिलासा मिळाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाच्या नव्या केसेसमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

मागील आकडेवारीच्या तुलनेत ही आकडेवारी 3,23,144 लाख होती.  देशात कोरोनामुळे 2,764 लोक मरण पावले. दरम्यान, कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या दोन लाखांच्या जवळपास पोहोचली आहे.

देशात कोरोना संक्रमणाची एकूण संख्या 1,76,36,307 आहे. तर मृतांचा आकडा 2 लाखाच्या जवळपास पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी देशात जवळपास 2.9 दशलक्ष एक्टीव्ह केसेस आहेत. 

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात आणि तामिळनाडू या 8 राज्यांमध्ये एक लाखाहून अधिक सक्रिय कोरोना केसेस आहेत.

गेल्या कित्येक दिवसांपासून भारतात तीन लाखाहून अधिक केसेस येत होत्या. त्याचबरोबर आता या प्रकरणात भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे.

Read More