Marathi News> भारत
Advertisement

Covid-19: 8 महिन्यानंतर देशात नवीन रुग्णांची संख्या 3 लाखांच्या पुढे

Coronavirus in India : भारतात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासांत देशात 3 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 

Covid-19: 8 महिन्यानंतर देशात नवीन रुग्णांची संख्या 3 लाखांच्या पुढे

मुंबई : Coronavirus in India : भारतात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासांत देशात 3 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेत देशात एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

24 तासांत 3.17 लाख नवीन कोरोनाचे रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 3 लाख 17 हजार 532 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर 491 जणांचा या साथीच्या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

इतकी प्रकरणे 8 महिन्यांनंतर 

देशात 8 महिन्यांनंतर कोविड-19 च्या नवीन रुग्णांची संख्या 3 लाखांच्या पुढे गेली आहे. यापूर्वी, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, 15 मे 2021 रोजी 3.11 लाख नवीन रुग्ण आढळले होते.

24 तासांत 2.23 लाख लोक ठणठणीत

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 23 हजार 990 लोक कोविड-19 साथीच्या आजारातून बरे झाले असले तरी सक्रिय रुग्णांची संख्या 91 हजार 519 ने वाढली आहे. यासह, देशातील सक्रिय प्रकरणांची संख्या  (Coronavirus Active Case in India) 19 लाख 24 हजार 51 वर पोहोचली आहे.

देशात पॉझिव्हिटि रेट वाढला 

देशात कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे पॉझिव्हिटि रेट म्हणजेच संसर्ग दर देखील 16 टक्क्यांच्या वर गेला आहे. देशातील दैनंदिन संसर्ग दर 16.41 टक्के, तर साप्ताहिक संसर्ग दर 16.06 टक्के झाला.

24 तासांत ओमिक्रॉनचे 9287 नवीन रुग्ण

कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारातील ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या  (Omicron Variant) रुग्णांची संख्याही 9 हजारांच्या पुढे गेली असून गेल्या 24 तासांत ओमिक्रॉनचे 9287 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यात कालच्या तुलनेत 3.63 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read More