Marathi News> भारत
Advertisement

देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती अर्ध्यावर येणार; गडकरी यांना ऑटोमोबाईल कंपन्यांचे आश्वासन

NITIN GADKARI | रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हटले, देशातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री येत्या 6 महिन्यांत फ्लेक्स इंधन इंजिनचे उत्पादन सुरू करेल. ही वाहने इथेनॉलवरही धावू शकतील. इथेनॉल मिश्रित इंधन हे पेट्रोलमध्ये मिसळून तयार होते. त्यामुळे पेट्रोल स्वस्त होऊ शकते.

देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती अर्ध्यावर येणार; गडकरी यांना ऑटोमोबाईल कंपन्यांचे आश्वासन

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले की ऑटोमोबाईल कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की ते सहा महिन्यांत फ्लेक्स इंधन वाहनांचे उत्पादन सुरू करतील.

'ईटी ग्लोबल बिझनेस समिट'ला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना, गडकरी म्हणाले की, सरकार 100 टक्के स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांपासून सार्वजनिक वाहतूक चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल 20 टक्के मिसळले जाते, ज्यामुळे ते मिश्रित इंधन बनते आणि ते सामान्य पेट्रोलच्या तुलनेत अर्ध्या किमतीत उपलब्ध आहे.

 वाहने 100% इथेनॉलवर चालतील

नितिन गडकरी म्हणाले, "या आठवड्यात, मी सर्व प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांच्या SIAM चे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यांनी मला आश्वासन दिले की ते एकापेक्षा जास्त इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी फ्लेक्स-इंधन इंजिन तयार करतील. गडकरी यांच्या मते, लवकरच भारतातील बहुतांश वाहने 100 टक्के इथेनॉलवर चालतील.

ग्रीन हायड्रोजन आणि इतर पर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काम करत आहे, असेही ते म्हणाले.

Read More