Marathi News> भारत
Advertisement

कोरोनाच्या नव्या व्हायरसचा लहान मुलांना धोका - शास्त्रज्ञ

ब्रिटनमधून आलेले २१ जण कोरोना पॉझिटीव्ह
 

कोरोनाच्या नव्या व्हायरसचा लहान मुलांना धोका - शास्त्रज्ञ

मुंबई : कोरोना व्हायरस (Corona Virus) सुरूवातीपासूनच संशोधकांसाठी एक कोडं बनून राहिलं आहे. असं असताना आता यामध्ये आणखी गुंतागुंत होत चालली आहे. संशोधकांचं म्हणणं आहे की, कोरोनाचा नवीन स्ट्रेन (Uk's New Corona Virus)  ५० ते ७० टक्क्यांहून अधिक संक्रमित आहे. अशातच या नव्या कोरोना व्हायरसच्या (New Corona Virus strain serios risk to Childern) स्ट्रेनमधून सर्वाधिक धोका हा लहान मुलांना आहे. 

ब्रिटनच्या इंपीरियल कॉलेज लंडनमध्ये महामारी संशोधक प्रो. नील फर्गस्न यांचं म्हणणं आहे की, पहिल्या कोरोना व्हायरसचा लहान मुलांवर कमी प्रभाव पडला होता. मात्र, हाती आलेल्या नव्या कोरोना व्हायरसच्या माहितीवरून हा व्हायरस लहान मुलांना सर्वाधिक धोकादायक आहे. 

यामुळे पहिल्या कोरोनाच्या तुलनेत कोरोनाचं हे नवं रुप लहान मुलांसाठी धोकादायक आहे. लहान मुलांना या संक्रमणाची लागण होऊ शकते. मात्र अद्याप या नव्या कोरोनाची लहान मुलांना लागण झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र असे असले तरीही आपण सतर्क राहणं सर्वाधिक आहे. नव्या स्ट्रेनमुळे लहान मुलांना कोरोनाची लागण झाली तर सर्वाधिक काळजी घ्यावी लागेल. 

१५ वर्षांहून कमी वयाच्या मुलांमध्ये कोरोनाचा स्ट्रेन सर्वाधिक 

डॉ. फर्गस्न यांचं म्हणणं आहे की, ब्रिटनमध्ये ज्या ठिकाणी नव्या व्हायरसची प्रकरण समोर आले आहे तेथे लहान मुलांना देखील लागण झाली आहे. मात्र हा आकडा अद्याप समोर आलेला नाही. इंपीरियल कॉलेज लंडनमधील वायरोलॉजिस्ट डॉ. वेंडी यांचं म्हणणं आहे की, लहान मुलांमध्ये ज्येष्ठांच्या तुलनेत एस-२ रिसेप्टर कमी अते. यामुळे व्हायरस आपलं जाळं पसरवतो. नवीन व्हायरस आणि एस-२ रिसेप्टरच्या भूमिकेवर अभ्यास सुरू आहे. 

Read More