Marathi News> भारत
Advertisement

Coronavirus : लॉकडाऊन पुढे ढकलण्याबाबत मोदी-मुख्यमंत्र्यामध्ये चर्चा

२१ दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता 

Coronavirus : लॉकडाऊन पुढे ढकलण्याबाबत मोदी-मुख्यमंत्र्यामध्ये चर्चा

मूंबई : जगभरात कोरोना व्हायरसमुळे १,००,००० हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. यातील ७०% मृत्यू हे युरोपमध्ये झाले आहेत. अशी माहिती एफपीने दिली आहे. याबरोबरच भारतात ६,७६० लोकांना कोरोनाची लागण झाली असून २०६ लोकांचा यामध्ये मृत्यू झाला असून ५१५ कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले असून आपापपल्या घरी गेले आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून हा २१ दिवसांचा लॉकडाऊन संपवायचा की, कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी त्यामध्ये वाढ करून तो १४ एप्रिलच्या पुढे वाढवायचा हे ठरवणार आहेत. ओडिसा पाठोपाठ पंजाबने देखील राज्याचं लॉकडाऊन आणखी २१ दिवस वाढवून १ मेपर्यंत केले आहे. 

१७ दिवसांच्या या लॉकडाऊनमध्ये भारतात शुक्रवारी सर्वात मोठी कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद करण्यात आली. एकाच दिवशी ८९६ नवीन कोरोनाबाधित रूग्ण भारतात सापडले तर ३७ कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं सांगण्यात आलं. मात्र देशात वाढते संक्रमण पाहता आरोग्य मंत्र्यांनी कम्युनिटी स्प्रेड नाकारले आहे. 

जगातील बहुतेक देशांमध्ये व्हायरस संक्रमण पाहता. जागतिक आरोग्य संघटनेने चेतावणी दिली की, साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी निर्बंध घातल्या गेलेल्या कोणत्याही गोष्टी अचानक सुरू करू नका. याचा सर्वात मोठा फटका बसू शकतो. १००६६१ लोकांचा यामध्ये मृत्यू झाला असून फक्त ७०२४५ लोकांचा मृत्यू हा युरोपमध्ये झाला आहे. डिसेंबर महिन्यात चीनमध्ये या रोगाची लागण सुरू झाली. इटलीत सर्वाधिक मृत्यू झाले असून हा आकडा १८,८४९ अमेरिकेत हा अकडा १७,९२५ तर स्पेनमध्ये १५,८४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

Read More