Marathi News> भारत
Advertisement

देशात दुहेरी संकट! H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला; जाणून घ्या कशी घ्यावी आरोग्याची काळजी

coronavirus update : कोरोना विषाणूने पुन्हा हात-पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला आहे. परिणामी राज्यात 24 तासाच रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

देशात दुहेरी संकट! H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला; जाणून घ्या कशी घ्यावी आरोग्याची काळजी

H3N2 And coronavirus update : एकीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत होता. त्यातच आता नव्या संसर्ग बरोबर कोरोनाची रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या महाराष्ट्रसह सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.  एका दिवसात 600 हून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. या दरम्यान लोक सर्दी आणि घसादुखीच्या तक्रारी घेऊन रुग्णालयात पोहोचत आहेत. तर H3N2 आणि कोरोना (H3N2 लक्षणे आणि कोरोना लक्षणे) यांच्यातील लक्षणे समान असल्यामुळे लोकांना हे कळू शकत नाही की त्यांना कोरोनाची लागण की H3N?  

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 426 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. परिणामी एकूण कोरोनाची रुग्णसंख्या 4623 वर गेली आहे. यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्रात प्रत्येकी दोन आणि उत्तराखंडमध्ये एकाचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी 18 नोव्हेंबरपासून भारतात सर्वाधिक 524 प्रकरणे होती. मात्र गेल्या सात दिवसांत 2,671 नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा गेल्या सात दिवसांत नोंदवलेल्या 1,802 प्रकरणांपेक्षा सुमारे 50 टक्कांनी अधिक आहे. 

वाचा : रुग्णालयात अ‍ॅडमिट न होताच मिळेल मेडिक्लेमची रक्कम, कसं ते जाणून घ्या

महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढत असून गेल्या आठवड्यात कर्नाटक (कर्नाटक) या तीन राज्यांमध्ये 584, केरळमध्ये 520 आणि महाराष्ट्रात 512 नवीन रुग्ण आढळले आहेत. या राज्यांमध्ये 86 टक्के नवीन प्रकरणे वाढली आहेत. त्याच वेळी, गुजरातमध्ये या कालावधीत 100 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर तामिळनाडूमध्ये 224 आणि तेलंगणामध्ये 197 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. इतर अनेक राज्यांमध्ये कोविडची प्रकरणे वाढत आहेत परंतु आठवड्याच्या शेवटी जाहीर केलेली आकडेवारी 100 पेक्षा कमी आहे. दिल्लीत गेल्या आठवड्यात 72 वरून 97 नवीन रुग्ण आढळले आहेत.

यावर आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 मधून बरे होणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. तर मृत्यूदर 1.19 टक्के आहे. कोरोना संसर्गामुळे मृतांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. तर देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोविड लसीचे 220.64 कोटी डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 

ही आहेत लक्षणे (corona and h3n2 virus symptoms)

कोरोना आणि H3N2 या नव्या विषाणूची लक्षणे सारखीच आहे. जर तुम्हाला ताप, खोकला, घसा खवखवणे, सर्दी, स्नायू किंवा शरीर दुखणे, डोकेदुखी, थकवा, उलट्या यांसारखे आजार असल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या...

अशी घ्या काळजी 

  • वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या
  • गरम पाण्याची वाफ घ्या 
  • कोमट पाण्यामध्ये हळद, मीठ टाकून गुळण्या करा 
  • वैद्यकीय सल्ल्याने औषध सुरू करा
  • शिंकताना, खोकताना नाकावर तोंडावर रुमाल धरा
  • हात वारंवार स्वच्छ धुवाी
  • पुरेशी विश्रांती घ्या 
  • मानसिक ताण, धूम्रपान आणि तंबाखू खाणे टाळा
  • विटामिन सी युक्त लिंबू, आवळा अशा पदार्थांचे सेवन करा
Read More