Marathi News> भारत
Advertisement

केंद्राकडून पुन्हा आर्थिक पॅकेजच्या घोषणेची शक्यता; परिस्थिती आणखी बिघडली तर उचलणार मोठं पाऊल

 प्रचंड संख्येने वाढते वाढते रुग्ण सरकारसमोर आव्हान आहे. 

केंद्राकडून पुन्हा आर्थिक पॅकेजच्या घोषणेची शक्यता; परिस्थिती आणखी बिघडली तर उचलणार मोठं पाऊल

नवी दिल्ली :  देशातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट थैमान घालत आहे.  प्रचंड संख्येने वाढते वाढते रुग्ण सरकारसमोर आव्हान आहे. कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाल्यास सरकार आणखी एक आर्थिक पॅकेजची घोषणा केंद्र सरकार करू शकते. असे संकेत नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी दिले आहे. गेल्यावर्षी कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते.

परिस्थिती अत्यंत बिकट

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढत आहे. परिस्थिती आधीपेक्षा अत्यंत गंभीर झाली आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे.

काही राज्यांनी इतर राज्यातील लोकांना आपल्या राज्यात येणं थांबवलं आहे. हजारोंच्या संख्येने लोकं मृत्यूमुखी पडत आहेत.

तरी भारतीय अर्थव्यवस्था 11 टक्क्यांनी वाढ नोंदवण्याची शक्यता नीति योगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले आहे.

Read More