Marathi News> भारत
Advertisement

देशात २४ तासात १३९६ नवीन रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या २७८९२ वर

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणखी वाढली

देशात २४ तासात १३९६ नवीन रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या २७८९२ वर

नवी दिल्ली : आज आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी म्हटलं की, आज पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांना त्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं आहे. रेड झोन आणि ऑरेंज झोनमध्ये येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी करुन ट्रान्समिशनची साखळी मोडली पाहिजे असं म्हटलं आहे.

लव्ह अग्रवाल यांनी म्हटलं की, 'गेल्या एका दिवसात ३८१ लोकं बरे झाले असून आतापर्यंत ६१८४ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. आपला रिकव्हरी रेट २२.१७ टक्के झाला आहे.'

'कालपासून, देशभरात १३९६ नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७८९२ वर पोहचली आहे.'

'देशातील १६ जिल्हे अशी आहेत जिथे गेल्या २८ दिवसात एकही रुग्ण आढळला नाही. एकूण ८५ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांपासून एकही रुग्ण आढळलेला नाही.' अशी माहिती लव्ह अग्रवाल यांनी आज दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८०६८ झाली आहे. तर ३४२ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्युदर ४.२४ आहे.

उत्तर प्रदेशमधील ५९ जिल्ह्यांमधून आतापर्यंत एकूण १९५५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, आज झांसी या बाधित जिल्ह्यांमध्ये सामील झाला आहे. अशी माहिती युपीच्या मुख्य आरोग्य सचिवांनी दिली आहे.

Read More