Marathi News> भारत
Advertisement

Corona : कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट वाढवतोय चिंता, अशा व्यक्तींना जास्त धोका?

कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे सब व्हेरिएंट आता जगभरात पुन्हा एकदा चिंता वाढवत आहेत.

Corona : कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट वाढवतोय चिंता, अशा व्यक्तींना जास्त धोका?

मुंबई : ओमायक्रॉनने गेल्या वर्षी जगभरात कहर माजवला होता. भारतातही हा प्रकार बहुतेक कोविड रुग्णांमध्ये आढळून येत आहे. पण आता त्याचे उपप्रकार वेगाने पसरत आहेत. Omicron चे sub variant BA.2.12.1 भारतात पोहोचला आहे. त्याचा संसर्ग सध्या मर्यादित असला तरी राज्यांना सतर्क करण्यात आले आहे. ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 उपप्रकारांची अनेक प्रकरणे महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये आढळून आली आहेत. .

BA.5 हा व्हेरिएंट 47 देशांमध्ये आढळला आहे. BA.2 हा प्रकार 42 देशांमध्ये आढळला आहे. भारतात आतापर्यंत आढळलेल्या नवीन सबवेरियंट्सचे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. तरीही, आरोग्य तज्ञांनी सावध केले की ज्या लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे त्यांना नवीन प्रकारांपेक्षा जास्त धोका आहे. तज्ञांच्या मते, सबवेरियंट्समुळे प्रकरणांमध्ये मोठी वाढ होणार नाही.

कोविड-19 प्रकरणे आणि पॉझिटिव्हीटी रेट पाहिला तर, 12 हून अधिक शहरांमध्ये हा दर 5% पेक्षा जास्त आहे. मुंबई शहराचा पॉझिटिव्हीटी रेट (WPR) 15.6% वर गेला आहे. ठाण्यात कोविडच्या नवीन रुग्णांमध्ये 3.2 पट आणि पुण्यात 2.2 पट वाढ झाली आहे. केरळमधील सहा जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा फैलाव चिंताजनक वेगाने होत आहे. 

महाराष्ट्रात 32% सक्रिय प्रकरणे आहेत. केरळमध्ये हे प्रमाण 32% आहे.

मुंबईतील अधिका-यांनी सोमवारी Omicron च्या BA.4 आणि BA.5 सबव्हेरियंटची पुष्टी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि इतर काही जिल्ह्यांमध्येही बीए.2.12.1 ची प्रकरणे आढळून आली आहेत. महाराष्ट्रात आता या प्रकारांची 15 प्रकरणे समोर आली आहेत. मुंबईशिवाय पुणे आणि ठाण्यातही कोविडचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट 15% पेक्षा जास्त आहे.

केंद्र सरकारने राज्यांना सांगितले आहे की BA.2.12.1 (BA.2 चे उपवेरिएंट, दोन्ही Omicron मधून घेतलेले), BA.4 आणि BA.5 ची प्रकरणे जगभरात वाढत आहेत. त्यांची प्रकरणेही देशात आढळून आली आहेत. केंद्राने नोटमध्ये म्हटले आहे की 'बीए.2.12.1 हे उत्तर अमेरिकेतील रुग्णवाढीचे कारण आहे. काही प्रकरणे महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही आढळून आली आहेत.

Read More