Marathi News> भारत
Advertisement

Union Minister Car Accident: केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील गाडी पलटली; अनेक पोलिस अधिकारी जखमी

केंद्रीय मंत्र्यांचा ताफा रात्री उशीरा राज्याच्या राजधानीच्या दिशेने जात असतानाच एका पुलावर हा अपघता झाला ज्यात ताफ्यातील एक गाडी पलटली

Union Minister Car Accident: केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील गाडी पलटली; अनेक पोलिस अधिकारी जखमी

केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांच्या ताफ्यातील गाडीला बिहारमध्ये भीषण अपघात झाला आहे. अश्विनी चौबे यांच्या ताफ्यातील पोलिसांची एक जीप उलटल्याची घटना रविवारी रात्री घडली. या अपघातामध्ये अनेक पोलीस अधिकारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

एका खड्ड्यामध्ये ही जीप पडली आणि पाच पोलिस अधिकारी जखमी झाले. या अपघातामध्ये चौबे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या अपघातात जखमी झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हा अपघात डुमरावमधील मठीला-नारायणपूर मार्गावर घडला. या अपघातानंतरचा व्हिडीओ स्वत: अश्विनी चौबे यांनी शेअर केला आहे. "बक्सरहून पाटण्याला जाताना डुमराव येथील मठीला-नारायणपूर' मार्गावर ताफ्यातील कोरानसराय पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. प्रभु श्रीरामाच्या कृपेने सर्वजण सुखरुप आहेत. जखमी पोलिस कर्मचारी आणि चालकाला घेऊन डुमरावमधील रुग्णालयात जात आहे," असं चौबे यांनी ट्वीट केलं आहे. हे ट्वीट चौबे यांनी 10 वाजून 58 मिनिटांनी केलं आहे.

या व्हिडीओमध्ये मंत्री चौबे हे पोलिसांना जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यासंदर्भातील सूचना करताना दिसतात.

Read More