Marathi News> भारत
Advertisement

Cooking Hacks: पुऱ्या फुगतच नाहीत? मग पुरी करताना मिसळा ही गोष्ट...टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार!

परफेक्ट पुऱ्या (perfect puri making) बनण्यासाठी कणिक मळण्यापासून ते तळण्यापर्यंत सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक करणं खूप महत्वाचं आहे.अश्याने पुऱ्या छान फुगत आणि खायला खूप सुंदर लागतील... 

Cooking Hacks: पुऱ्या फुगतच नाहीत? मग पुरी करताना मिसळा ही गोष्ट...टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार!

Smart Kitchen Tips: जेवण बनवणं ही एक कला आहे (Cooking is an art) . सर्वानाच स्वादिष्ठ पक्वान्न बनवणं शक्य होत नाही. जेवण बनवताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं असत.

बऱ्याचदा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे जेवण आणखी स्वादिष्ट होऊ शकत किंवा काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करता येतात. म्हणून काही कुकिंग टिप्स (cooking tips) आपल्या जेवणात मदत करतात.

पुरी बनवणं तास वर वर पाहता खूप सोपं वाटतं पण हे सुद्धा एक अवघड काम आहे कारण पुऱ्या कधी खूपच वाटत होऊन जातात तर कधी खूपच कडक होतात. आणि मग  पण काही सोप्या आणि स्मार्ट टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही परफेक्ट टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवू शकता . (how to make perfect puri)

परफेक्ट पुऱ्या बनण्यासाठी कणिक मळण्यापासून ते तळण्यापर्यंत सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक करणं खूप महत्वाचं आहे.अश्याने पुऱ्या छान फुगत आणि खायला खूप सुंदर लागतील... 

आणखी वाचा : cooking tips : पुऱ्या तळताना खूप तेल सोकतात का? 'या' टिप्स वापरा...पुऱ्या होतील ऑइल फ्री

पुऱ्या करणं आता खूप अवघड काम नाही आहे , प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी काही अश्या टिप्स सांगितल्या आहेत ज्या वापरून तुम्ही उत्तम पुऱ्या बनवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया अश्याच काही हटके किचन टिप्स आणि कूकिंग हॅक्स विषयी.

सर्वात महत्वाची टीप म्हणजे पुऱ्या बनवताना जी कणिक मळता ती चपातीच्या कणकेप्रमाणे सैर किंवा मऊ नसावी थोडी घट्ट कणिक पुऱ्यांसाठी मळायची आहे.  

पुऱ्याची कणीक घट्टसर भिजवायचेय म्हणून पाणी घालताना थोडं जपून कमी कमी घाला एकदम खूप पाणी घातलात तर पीठ खूप मऊ होऊन जाईल. आणि पुऱ्या करणं खूप अवघड होऊन जाईल. 

पुऱ्या चांगल्या फुगण्यासाठी कणिक मळल्यावरत्यावर एक ओला कापड घालून काही वेळ ठेवावा. (dough making for puri)

आता कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि त्यावर तेल ओतून ठेवा अश्याने कणकेचे गोळे कडक होणार नाहीत आणि फुटणार नाहीत. 

पुऱ्या लाटण्याचे लाटणे एकदम स्वच्छ असेल याची खातरजमा करून घ्या. यासाठी लाटण्यावर सुद्धा तेल लावून घ्या. 

पुरी सर्व बाजूने एकसारखी लाटली जाईल याची खात्री करा  मुख्यतः पुरीचे काठ सर्व एकसारखे लाटा. अश्याने पुरी छान फुगते. 

पुरी तळताना मोठ्या गॅसवरच टाळल्या गेल्या पाहिजेत त्यामुळे पुरी ला सर्व बाजूने हीट लागून ती व्यवस्थित फुगते. 

पुरी तळत असताना दाबून गोल गोल फिरवावी त्यामुळेदेखील पुरी टम्म फुगू लागते. 

चला तर मग, या टिप्स वापरून गोलमटोल मस्त फुगलेल्या पुऱ्या बनवून घ्या आणि सर्वांची वाहव्वा मिळवा... 

Read More