Marathi News> भारत
Advertisement

मेघालयमध्ये काँग्रेसचा विजय, सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेतून बाहेर

दोन्ही पक्षांकडे 20-20 जागा होत्या पण आता काँग्रेसकडे 21 जागा

मेघालयमध्ये काँग्रेसचा विजय, सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेतून बाहेर

नवी दिल्ली : विधानसभेच्या 10 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत मेघालयमधील अंपाती सीट जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यावर्षीच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि एनपीपी यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली होती. एनपीपीने भाजप आणि इतर पक्षांच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं. आधी दोन्ही पक्षांकडे 20-20 जागा होत्या पण आता काँग्रेसकडे 21 जागा झाल्या आहेत.

अंपाती सीटसाठी काँग्रेसने मियानी डी शिरा यांना मैदानात उतरवलं होतं. त्यांनी नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) उमेदवार जी मोमीन यांचं 3191 मतांनी पराभव केला. मियानी यांचे वडील मुकुल संगमा यांनी ही जागा सोडल्यानंतर येथे पुन्हा निवडणूक झाली होती. मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमांनी विधानसभा निवडणुकीत अंपाती आणि सोंगसाक या 2 जागांवर निवडणूक जिंकली होती. येथे 90.55 टक्के मतदान झालं होतं. या जागेवर माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी लागोपाठ 6 वेळा निवडणूक जिंकली होती.

Read More