Marathi News> भारत
Advertisement

मोबाईल रात्रभर बंद करुनही डेटा संपला कसा? खासदाराने थेट संसदेत माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांनाच विचारला प्रश्न

सध्या अनेक टेलीकॉम कंपन्या डेटा संदर्भात ग्राहकांना जबरदस्त ऑफर देत आहेत. अनेक डेटा प्लानमध्ये ग्राहकांना दिवसाला 3 GB पर्यंत डेटा मिळतो. मात्र, कमीत कमी इंटरनेटचा वापर करुनही डेटा संपत आहे. अनेक ग्राहकांना तर इंटरनेट न वापरताही डेटा संपल्याचा मसेज येतो.

मोबाईल रात्रभर बंद करुनही डेटा संपला कसा? खासदाराने थेट संसदेत माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांनाच विचारला प्रश्न

Mobile Internet Data : इंटरनेटचा कमीत कमी वापर करुनही अथवा बऱ्याचदा वेळे आधीच मोबाईल डेटा(Mobile Data) संपतो. लाखो मोबाईल ग्राहक यामुळे त्रस्त झाले आहेत. या समस्येमुळे सर्वसामान्य ग्राहकच नाही तर राजकीय नेते मंडळी देखील वैतागले आहेत. डेटा संपत असल्याने संतप्त झालेले काँग्रेस खासदार जसबीर सिंग गिल(Congress MP Jasbir Singh Gill)  थेट संसदेतच हा  प्रश्न उपस्थित केला. मोबाईल रात्रभर बंद करुनही संपला डेटा. माझा डेटा रात्रभर कुणी वापरला असा सवालच त्यांनी माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव(Information and Technology Minister Ashwini Vaishnav) यांना विचारला.

सध्या अनेक टेलीकॉम कंपन्या डेटा संदर्भात ग्राहकांना जबरदस्त ऑफर देत आहेत. अनेक डेटा प्लानमध्ये ग्राहकांना दिवसाला 3 GB पर्यंत डेटा मिळतो. मात्र, कमीत कमी इंटरनेटचा वापर करुनही डेटा संपत आहे. अनेक ग्राहकांना तर इंटरनेट न वापरताही डेटा संपल्याचा मसेज येतो.

काँग्रेस खासदार जसबीर सिंग गिल यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला. रात्रभर मोबाईल बंद असताना डेटा संपतो. याचा अर्थ रात्रभर भुत मोबाईलचा डेटा वापरतात का असं म्हणत त्यांनी  माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

खासदार जसबीर सिंग गिल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसच्या काळात BSNL चा पूरेपूर वापर करुन घेतला गेला. आता BSNL कंपनीला चांगले दिवस येणार आहेत. मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांची लुट होत असल्याचा आरोप खासदार जसबीर सिंग गिल यांनी गेला. मात्र, काँग्रेसच्या काळात 1GB डेटासाठी 200 रुपये मोजावे लागत होते. आता फक्त 20 रुपयात 1GB डेटा मिळत असल्याचे उत्तर मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले.     

खासदार जसबीर सिंग गिल यांनी उपस्थित मोबाईल डेटा बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मात्र, खासदार जसबीर सिंग गिल आणि  माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात चांगलीच जुंपली.

Read More